राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान.

44
राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान.

राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान.

राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : दि.6/12/023 पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – 2 साई मौजे चांदोरे येथे वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव श्री तुकाराम मुंडे साहेब यांचा हा कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे
जिल्हा परिषद रायगड
डॉ. श्याम कदम साहेब
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरांची सुरुवात साई पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत मौजे चांदोरे या ठिकाणी गोमातेचे पूजन करून करण्यात आली.या शिबिरामध्ये खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले या शिबिरामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -2 साई येथे कार्यरत असणारे श्री. व्ही .एस एल. घुगे पशुधन पर्यवेक्षक यांनी योग्य असे मोलाचे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना जंतूनाशक औषधे व गोचीडजण्य औषधे मिनरल मिक्स्चर वाटप करण्यात आले व योजनेबद्दल माहिती देण्यात आली तसेच स्वच्छ घोटा व निर्जंतुकीकरण करण्यात आले गाई म्हशींचे आरोग्य कसे निरोगी राहील आणि वेळेवर कसे माजावर येईल आणि कृत्रिम रेतनाद्वारे चांगल्या प्रजातीचे पैदास कसे तयार करता येईल आणि पशुपालकांचे दूध उत्पादन कसे वाढवेल ह्या उद्देशाने शिबिरातून माहिती देण्यात आली
तसेच सेवानिवृत्त अधिकारी डॉ. शहा साहेब यांनी सुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत चांदोरे सरपंच साक्षी शिंदे मॅडम तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य व बौद्धवाडी रोहिदास वाडी, दोन्ही नलेफोडी, गवळवाडी, रानवडे तसेच आदिवासी वाडी अध्यक्ष व पंचायत समिती माणगाव माजी सभापती सुजित शिंदे, मानव अधिकार विभागीय अध्यक्ष नंदकुमार चांदोरकर, मानव अधिकार विभागीय उपाध्यक्ष गणेश दिवेकर साहेब तसेच ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत चांदोरकर, मंगेश भुवड, ग्रामपंचायत विभागातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते