मॅजिक बस संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत इंदाळा येथे पालक सभेचे आयोजन

20
मॅजिक बस संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत इंदाळा येथे पालक सभेचे आयोजन

मॅजिक बस संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत इंदाळा येथे पालक सभेचे आयोज

मॅजिक बस संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत इंदाळा येथे पालक सभेचे आयोजन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 9 डिसेंबर
मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या नियंत्रणात गडचिरोली तालुक्यातील कनेरी या गावात १२ ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाद्वारे शिक्षण जीवन कौशल्य व पायाभूत गणित आणि भाषा मिळावे याकरिता समग्र शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी बुधवारला ग्रामपंचायत इंदाळा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या समग्र शिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देण्याकरिता पालक सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेमध्ये मॅजिक बस संस्थेची सुरुवात, संस्थेचे उद्देश, संपूर्ण शिक्षण कार्यक्रमाचे उद्देश,कार्यरत गावे,शाळा यावर परिपूर्ण माहिती सांगण्यात आली.सभेला ग्रामपंचायत इंदाळा सरपंच मनोज जेंगठे साहेब,सदस्य गुरू मोहुरले, जेंगठे साहेब, माजी पंचायत समिती सभापती सविता कावडे मॅडम यांनी उपस्थिती दर्शविली. सभेमध्ये पसंपूर्ण शिक्षण कार्यक्रमासंबंधी माहिती देताना खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये जिवन कौशल्य कसे रुजविले जातात हे सांगण्यात आले.
पालक सभेचे आयोजन व सभेच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेच्या जिवन कौशल्य शिक्षिका प्राजक्ता दुर्योधन यांनी मेहनत घेतली.