नेरळ राजेंद्र गुरुनगर, अधिका निवास तसेच साळेकर चाळ येथील नागरिकांस जीविताला धोका? ह्याला जबाबदार कोण?

55
नेरळ राजेंद्र गुरुनगर, अधिका निवास तसेच साळेकर चाळ येथील नागरिकांस जीविताला धोका? ह्याला जबाबदार कोण?

नेरळ राजेंद्र गुरुनगर, अधिका निवास तसेच साळेकर चाळ येथील नागरिकांस जीविताला धोका?
ह्याला जबाबदार कोण?

नेरळ राजेंद्र गुरुनगर, अधिका निवास तसेच साळेकर चाळ येथील नागरिकांस जीविताला धोका? ह्याला जबाबदार कोण?

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

आय. एस. ओ. नामांकन मिळालेल्या नेरळ ग्रामपंचायतीतील नारीकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येथील मुलभूत सुविधा पुरविण्यास ग्रामपंचाय असमर्थ ठरीत आहे. नागरिकान कडून कर वसूल केला जात आहे पण येथील राजकरणी व प्रशासन मुलभूत सुविधा देण्यास असमर्थ का बरे ठरत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. कारण दिवसेन-दिवस नागरीकरण वाढत आहेत पण कचरा, सांड पाणी निवारण करणे, पिण्याचे पाणी देणे हे मुलभूत सुविधा का बर देत नाहीत. जर कोणी ह्यात दगावले तर ह्यास प्रशासन जबाबदार राहील असे स्थानिक जनता बोलत असून नारीकान मध्ये चीड निर्माण झाले आहे. कचरा उघड्यावर टाकण्याचे कारण येथे कचरा कुंडी बनवली नाही. उघड्यावर कचरा टाकला जातो तो उचाण्यासाठी कोणी येत नाही.
साई श्रद्धा हॉटेल च्या मागे गटारातून कचरा काढून बरेच दिवस झाले तो कचरा उचाण्यासाठी अध्याप कोणी आले नाही. ग्रामपंचायती कडे जाऊन निवेदन दिल्यावर ग्रामसेवक येऊन पाहणी करून गेले पण फक्त तोंडी आश्वासन देण्यात आले आहे. परंतु अध्याप परीस्तीती जैसी की तैसी आहे. येथील नागरीक हैराण झाले असून कचरा कुंडी ची मागणी होत आहे. गटारे साफ करण्याची मागणी होत आहे. सगळीकडे डेंगू आजार पसरत आहे त्या मुळे नेरळ येथील नागरीक भयभित आहेत कधीच गटारांमध्ये फवारणी होत नाही.
ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याचे लोखंडी पाईप ह्याच गटारातून प्रतेकाच्या घरात किव्हा बिल्डींग मध्ये गेले आहेत. लोखंड म्हटले की त्याला गंज पकडणार व तेच गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये पाईपमधून घरघरत जाणार व रोगराई पसणार. तुडुंब गटारे भरून देखील स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून का बरे कामे होत नाहीत असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.

जोया मेडिकलच्या आतील गल्लीत रुग्णवाहिका यायला जायला मार्गच उपलब्ध नाही. कारण येथे बाहेरील नारिक येयून मोटर सायकल सकाळी पार्क करून जातात व रात्री घेऊन जातात दिवसभर रस्त्यातून यायला जायला साधा चालायला सुद्धा मार्ग नसतो. ह्या बाबत स्थानिकांनी लेखी निवेदन देऊनही ग्रामपंचायती कडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. की पोलीस प्रशासन ह्यास आळा घालत नाही. नागरिकांनी विनंती केली आहे की लवकरात लवकर मुलभूत सुविधा देण्यात याव्या.