लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

55
लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा- विवेक बोढे

🖋️ साहिल सैय्यद
📱 9307948197

घुग्घुस : 10 डिसेंबर
घुग्गुस येथील व परिसरातील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.
पात्र लाभार्थ्यांना लाकूड आधारित सुतार ( दुरुस्ती/ सुतार काम), होडी बांधणारा लोह/धातू आधारित (कुऱ्हाड, पावशी बनविणारा), लोहार, हातोडा आणि टुलकिट कारागीर, कुलूप बनविणारा, सोने/चांदी आधारित सोनार, मातीवर आधारित कुंभार, दगडावर आधारित, शिल्पकार ( मुर्तिकार, शिल्प तयार करणारा), दगड तोडणारा (वडार), चर्म आधारित मोची (चर्मकार)/ चप्पल बनविणारा/ फुटवेअर कारागीर, बांधकाम गवंडी (मिस्त्री) अन्य बॉस्केट/चटई, झाडू बनविणारा/कॉयर विणकर, बाहुली आणि खेळणी मेकर पारंपरिक, केशकर्तनकार (न्हावी), हार बनविणारा (मालाकार), धोबी, शिंपी, मासेमारी जाळे बनविणारा (कोळी), ढिवर असे व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना अर्जदाराचे आधार कार्ड, शिधापत्रिका, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला) आवश्यक आहे.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची नि:शुल्क सेवा ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र घुग्घुस तहसील कार्यालय समोर सुरु आहे.

या योजनेसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा अंतर्गत नोंदणी करीता किमान वय १८ वर्ष पुर्ण, लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या पीएमईजिपी, पीएम स्वनिधी मुद्रा किंवा राज्य सरकारच्या स्वयंरोजगार/ व्यवसाय विकासासाठीच्या योजना यासारख्या क्रेडिट आधारित योजनांच्या अंतर्गत गेल्या ५ वर्षात कर्ज घेतलेले नसावे, (स्वयं-घोषणा आणि बँकाकडून देय उपक्रम), नोंदणी आणि त्यातून मिळणारे फायदे कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित असतील, सरकारी सेवेत असणारी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय या योजने अंतर्गत पात्र असणार नाहीत अशी पात्रता आहे.

पीएम विश्वकर्मा अंतर्गत नोंदणी- विश्वकर्मा म्हणून ओळख तसेच पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, क्रेडिट सहाय्य- संपाश्विक मोफत एंटरप्रायज डेव्हलपमेंट कर्ज: १ लाख रुपयांमार्फत (१८ महिण्यात पहिला हप्ता), २ लाखापर्यंत (३० महिण्यात परतफेडी साठी दुसरा हफ्ता), ५% सवलतीचा व्याज दर- भारत सरकारद्वारे जास्तीत जास्त ८ % पर्यंत व्याज सवलत (क्रेडिट तपासणी समिती प्रचलित व्याजदर लक्षात घेऊन सवलत मर्यादेत सुधारणा करू शकते) क्रेडिट ग्यारंटी शुल्क भारत सरकार उचलेल, कौशल्य सुधारणा- कौशल्य आयडी पडताळणीनंतर ५ ते ७ दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण, १५ दिवस किंवा त्याहून अधिक काळ प्रगत प्रशिक्षण, प्रशिक्षण वेतन- ५०० रुपये प्रतिदिन लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.