सेवाभावी संस्थांनी शेवटच्या गरजु पर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी – आ. किशोर जोरगेवार • लव्ह इंडिया चर्च च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे आ.जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

80
सेवाभावी संस्थांनी शेवटच्या गरजु पर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी - आ. किशोर जोरगेवार • लव्ह इंडिया चर्च च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे आ.जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

सेवाभावी संस्थांनी शेवटच्या गरजु पर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी – आ. किशोर जोरगेवार

• लव्ह इंडिया चर्च च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे आ.जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

सेवाभावी संस्थांनी शेवटच्या गरजु पर्यंत आरोग्य सेवा पोहचवावी - आ. किशोर जोरगेवार • लव्ह इंडिया चर्च च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे आ.जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 डिसेंबर
वातावरणीय बदलामूळे विविध रोगांची लागण होत आहे. अशात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सेवा भावी संस्थांनी विविध भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन शेवटच्या गरजु पर्यंत्न आरोग्य सेवा पोहचवावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
अष्टभुजा वार्ड येथील लव्ह इंडिया चर्च येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जोरगेवार यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी फादर सुनिल कुमार, डॉ. प्रणाली ढवस, डॉ. हिना पाटील, डॉ. राकेश अंबादी, डॉ. राहुल पाटील, डॉ. मुग्धा पुल्लावार, डॉ. नवीन राव, फादर बिबीन थेक्केकरा, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपण शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुल शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थांना बळकट करण्याचे काम सुरु केले आहे. या अंतर्गत अनेक शिक्षण संस्थांना आपण संगणक व ईतर शिक्षण उपयोगी साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. तर आरोग्य क्षेत्रातही आपण काम करत आहोत चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने व यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आपण विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहोत. यावेळी जवळपास दिडशे रुग्णांवर आपण यशस्वी शस्त्रक्रिया केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आयोजित आरोग्य शिबिरात विविध विषयातील तज्ञ डॉक्टरांनी आपण बोलाविले आहे. नागरिकांनीही या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला पाहिजे. आपल्यासाठी आयोजित असे आयोजन आपल्या सहकार्यातुनच यशस्वी होत असतात. धकाधकीचे व व्यस्त जीवन जगत असतांना आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, महिलांनी विशेषत: आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी बोलताना आ. जोरगेवार यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.