स्थानिक स्वराज्य संस्था लांबल्याने अधिकारी झाले मुजोर

66
स्थानिक स्वराज्य संस्था लांबल्याने अधिकारी झाले मुजोर

स्थानिक स्वराज्य संस्था लांबल्याने अधिकारी झाले मुजोर

स्थानिक स्वराज्य संस्था लांबल्याने अधिकारी झाले मुजोर

✒️ संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

कर्जत पंचायत समिती कार्यालय येथे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाला कामाच्या वेळेत टाळे असल्याचे आढळून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लांबणीवर गेलेल्या आहेत त्यामुळे अधिकारी वर्गावर कुणाचाही वचक राहिला नसल्याने अधिकारी वर्ग ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने चालत आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, अंगणवाडी , पाणीपुरवठा, बांधकाम या सर्वच विभागांची स्थानिक पातळीवर बोंबाबोंब सुरू आहे. अशी नागरिकात जोरदार चर्चा सुरू आहे.

अलीकडे सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांना सुद्धा याबाबत अनुभव आल्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा या विरोधात उपोषण करेल असे पत्र दिले होते.
तसेच पळसदरी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक ट्रेनिंग साठी गेले असून त्या ठिकाणी नेमलेले ग्रामसेवक फोन बंद करून तालुक्याबाहेर गेल्याने नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली .
अशा अनेक चर्चा नागरिकांमध्ये होत असताना वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी याची दखल घेतील का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उठऊ लागले आहेत.तसेच बरेचशे ग्रामीण स्तरावर काम करणारे कर्मचारी हे जिल्ह्याबाहेर राहणारे असल्याने शनिवार – रविवार सुट्टी निमित्त शुक्रवारी कर्मचारी वरिष्ठांना अंधारात ठेऊन गावी पळ काढीत असतात अशी जोरदार चर्चा जनसामान्य मध्ये आहे.