द. ग. तटकरे महाविद्यालय, माणगाव येथे सायबर सुरक्षा व मार्गदर्शन शिबीर विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-एमकेसीएल रायगड व रायगड जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने येथील द. ग. तटकरे महाविद्यालय, माणगाव येथे नुकतेच सायबर सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगड पोलीस दल आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) च्या संकल्पनेतून सुरक्षित व सतर्क समाज घडवण्यासाठी जनजागृती अभियानचे आयोजन करण्यात आहे.
या अभियानातून माहिती तंत्रज्ञाना बाबत माहिती देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सतिश आस्वर यांनी ऑनलाईन फसवणूक, मेसेजच्या साहाय्याने त्रास देणे तसेच विविध प्रकारे तरुणींची फसवणूक होण्याचे प्रसंग आल्यास न घाबरता त्यांनी व त्यांच्या पालकांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांची माहिती गुप्त ठेवून संबंधित गुन्ह्यांचा तपास सायबर तज्ञांमार्फत कशाप्रकारे केला जातो याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ रायगड प्रतिनिधी श्री. मंगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सायबर सुरक्षेची आवश्यकता आणि विविध उपाय याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी सायबर क्राईम अंतर्गत विविध प्रकारचे गुन्हे कशाप्रकारे घडतात आणि त्यापासून आपण स्वतःचा बचाव कसा करावा, मोबाईलचा वापर करीत असताना त्यामधील अनावश्यक ॲप्स काढून टाकणे, इतर आवश्यक ॲप्स वेळोवेळी अपडेट्स करणे, तसेच नियमितपणे आपला पासवर्ड बदलणे या गोष्टी केल्यास आपण स्वतःचा अनेक प्रकारच्या फसवेगिरी पासून बचाव करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने तंत्रज्ञानातून लाभ, दोष, सतर्कता, माहितीतून आपल्या दैनंदिन जीवनात कसे प्रलोभनापासून दूर राहता येईल, त्यावर मात करता येईल आणि मोबाईल, सोशल मीडियावर आपल्या सुरक्षित व खाजगी आयुष्या बाबत गोपनीयता ठेवून सतर्क राहता येईल यासाठी चलचित्र, सायबर सुरक्षा लिंक, आपत्कालीन नंबर अश्या अनेक मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली.यावेळी माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्री. सतिश आस्वर, एमकेसीएल कोकण विभाग समन्वयक श्री. मंगेश जाधव, श्री. विश्वास मते (रायगड जिल्हा कन्सल्टंट), मुख्याध्यापक श्री. बी. एम. खामकर, जे. आर. पांडे, सफा थांगे, देवांक परब, आदिल बडे व तालुक्यातील केंद्र समन्वयक श्री. सुरज महाडिक, सौ. किशोरी हिरवे, तसेच इत्यादींसह विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.