चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन”, प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये • वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग • हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी

50
चंद्रपूर मनपातर्फे " भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन", प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये • वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग • हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी

चंद्रपूर मनपातर्फे ” भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन”, प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये

• वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग
• हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी

चंद्रपूर मनपातर्फे " भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन", प्रथम बक्षीस १ लक्ष ५१ हजार रुपये • वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग • हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी

*🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा*
📱 8830857351

चंद्रपूर ११ डिसेंबर –
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन संपुर्ण राज्यातील हरहुन्नरी कलावंतांचा यात समावेश असावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे.
१९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येणार आहे. शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर,वृक्षांवर विविध विषयांवर चित्र रेखाटण्यात येणार असुन महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही शहरातील रहिवासी नागरीक यात सहभागी होऊ शकतो. वयाचे बंधन नसल्याने व्यावसायिक तसेच हौशी चित्रकारांना सुद्धा भाग घेता येणार असुन उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत नेमून दिलेल्या झाडांचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित आहे. यात अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत सार्वजनिक ठिकाणी सभोवताली उपलब्ध असलेल्या वस्तु / झाडी इत्यादींचा वापर करून कलात्मक पेंटींग करणे अपेक्षित आहे.यात सुद्धा अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
क्रिएटिव्ह पेंटिंग करतांना शहरातील सार्वजनिक स्थळांच्या आजूबाजूचा परिसराचा वापर करता येणार आहे उत्कृष्ट संकल्पनेला गौरवान्वित केले जाणार आहे.