सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार..

57
सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार..

सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार..

सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाची स्वप्नपूर्ती होणार..

स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

चंद्रपूर :महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री असताना राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती दुर्बल घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अमलात आणली. यामुळे मागासवर्गातील अनेक नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र अल्पावधीतच सरकार गेल्याने ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील बहुतांश नागरिकांची घरकुलांची मागणी प्रलंबित होती. ही मागणी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित झाले असून सावली तालुक्यातील 23 गावातील 873 नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

राज्यात विविध समाजासाठी समाजवार पद्धतीने घरकुल योजनांची शासनाने आखणी केली आहे. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांसाठी कुठलीही योजना महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी कार्यरत नव्हती. या प्रवर्गासाठी राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या विकासात्मक दूरदृष्टी कोणातून विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाला विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्या हेतू व समाजातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पहिल्याच टप्प्यात ब्रह्मपुरी मतदार संघात जवळपास 3 हजार घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र अडीच वर्षाचा काल लोटताच सरकार बदलले आणि अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले. नागरिकांच्या मागणीचा विचार लक्षात घेत वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणे हेतू विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वस्त न बसता वारंवार शासन दरबारी मागणी रेटून धरल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सावली तालुक्यातील कापसी, जिबगाव, लोंढोली, चांदली (बुज) बोरमाळा चीज बोडी हिरापूर उसेगाव पारडी कवटी चीचबोडी ,साखरी, घोडेवाही, चक पिरंजी, अंतरगाव चिंचोली, तांबेगडी मेंढा, सामदा ,मोखाडा खेडी, थेरगाव, बेलगाव, व्याहाड (बुज) या 23 गावातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांची शासन दरबारी धडपड व सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा तसेच उपरोक्त लाभ घेणाऱ्या गावातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत हे या यशाचे फलित असून सावली तालुक्यातील 873 लाभार्थ्यांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे