कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सी. सी. टिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा (ता. प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सी. सी. टिव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील जनतेचा आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन सी. सी. टिव्ही कॅमेरे लावण्यात आले. कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात अशाच प्रकारे जनतेची सेवा करीत राहिल अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, ग्राम पंचायत सदस्य रंजना दिवाकर पिंगे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्राम सेवक मरापे, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेंडे उध्दव आस्वले लटारी बल्की, देवराव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दत्ता पिंपळशेंडे मदन वाढई, विठ्ठल विददे, कवडु गौरकार, गणपती कुकडे, नवनाथ ताजणे, अरुण आस्वले, मारोती वाढई, सतीश आबिंलकर, लक्ष्मण आत्राम, मारोती खाडे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे, प्रविण भेंडारे, विनोद सिडाम, ज्ञानेश्वर वांढरे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.