आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला भेट

61

भवन लिल्हारे भंडारा जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847

भंडारा : आज आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालक यांच्याकडून निघालेल्या आक्रोश मोर्चाला भेट दिली.
राज्यातील २७८९३ ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प केंद्र शासन व राज्यशासनाच्या मार्ग दर्शनाखाली सुरू आहे. व त्यामध्ये १९४७५ संगणक परिचालक कार्यरत असून शासनाच्या ग्रामविकास विभाग व इतर विभागाच्या सर्व सेवा सुविधा अहोरात्र पूरविण्याचे काम मागील १२ वर्षापासुन संगणक परिचालक करीत आहेत.
परीचालकांनी यावेळी आपल्या प्रमुख मागण्या प्रशासना पुढे ठेवले.
१. मा. यावलकर समितीचा अहवाल स्विकारत महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांचा सुधारीत आकृतीबंधात समावेश करावा.
२. मानधन रुपये २०,०००/- निश्चित तारखेला देण्यात यावे.
३. चुकीची टार्गेट सिस्टीम बंद करण्यात यावी.
या प्रमुख मागण्या आमदार राजुभाऊ कारेमोरे यांना सांगितल्या.
या वेळी आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी संगणक परिचालकांच्या सांगितलेल्या मागण्याबाबद शासन स्तरावर पाठपुरावा करणार असुन मी परिचालकांच्या सोबतीला आहे असे आश्वासित केले.