शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी चंद्रपुरात शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन • *रविवार 17 डिसेंबर रोजी चंद्रपुरात भव्य परिषद*

57
शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी चंद्रपुरात शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन • *रविवार 17 डिसेंबर रोजी चंद्रपुरात भव्य परिषद*

शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी चंद्रपुरात शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन

• *रविवार 17 डिसेंबर रोजी चंद्रपुरात भव्य परिषद*

शाळा, शिक्षण वाचविण्यासाठी चंद्रपुरात शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन • *रविवार 17 डिसेंबर रोजी चंद्रपुरात भव्य परिषद*

*🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 15 डिसेंबर
केंद्र सरकारने जुलै 2020 मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP जाहीर केले. हे धोरण मंजूर करताना ते संसदेत चर्चेसाठी मांडलेले नाही तसेच पुरेसा वेळ देऊन त्यावर शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित घटकांची चर्चा ही केली नाही. कोरोना आपत्तीच्या अत्यंत बिकट काळात हे धोरण एकाधिकारशाहीच्या पद्धतीने पुढे रेटण्यात आले आणि तात्काळ ते प्रशासकीय आदेशाद्वारे लागू करणे सुरु केले. देशातील काही मोजकी बिगर भाजप शासित राज्ये वगळता बहुतेक राज्यात या अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. मुलतः राज्यघटनेत शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत असल्याने राज्याशी जी लोकशाहीपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. तीही या सरकारने केलेली नाही. धोरण मंजुरी पासून त्याच्या अंमलबजावणीच्या सर्वच प्रक्रियेत या सरकारच्या आत्यंतिक लोकशाही विरोधी वर्तनाचे प्रत्यंतर येत आहे. या धोरनाअंतर्गत महाराष्ट्रातील 65 हजार सर्व जिल्हा परिषद शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली भांवलदरांच्या घश्यात टाकून शिक्षण शुल्क भरमसाठ वाढवून बहुजनांची लेकरे शिक्षणा शिवाय कसे वंचित राहतील याचा जाणीपूर्वक कट कारस्थान चालू आहे.
गावच्या शाळा बंद करुन शाळा संकुल उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे घराजवळची शाळा बंद होऊन दुरपर्यंत मुले शाळेत जाऊ शकणार नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर कायमचे फेकले जाईल.
त्यामुळे शाळा वाचविण्यासाठी शिक्षण वाचवण्यासाठी व केजी टू ते पीजी पर्यंत फ्री शिक्षण हा आमचा अधिकार कसा आहे? हे सांगण्यासाठी सरकारच्या या शिक्षण विरोधी धोरणाची माहीती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण बचाव समिती, जि. चंद्रपूर च्या वतीने रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे विदर्भस्तरिय शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेला शिक्षणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ( जे एन यु )दिल्ली चे माजी प्राध्यापक पद्मश्री सुखदेव थोरात हे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे स्वागताध्यक्ष चंद्रपूरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे व उद्घाटक नागपूर विभागीय शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले राहणार आहेत. शिक्षण बचाव समन्वय समिती म. राज्य चे निमंत्रक, शिक्षणतज्ञ रमेश बिजेकर , नागपूर हे या परिषदेचे अध्यक्ष राहतील. ही परिषद दोन सत्रामध्ये संपन्न होणार आहे. पहिले सत्र हे परिसंवादाचे असेल यात राष्ट्रीय शिक्षण धोरण भारतीय समाजाच्या शिक्षण बंदीचा मसुदा या विषयावर जे एन यु स्कॉलर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रा.डॉ.संतोष सुरडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण हक्क कायदा आणि सरकारची भूमिका या विषयावर सत्यशोधक शिक्षक सभा, तुमसर चे रेणुकादास उबाळे हे मार्गदर्शन करतील आणि शाळा बंदी, कंत्राटीकरण व खाजगीकरणाचा स्त्री शिक्षण, रोजगार व एकूण समाजावर होणारा व्यापक दुष्परिणाम या विषयावर बालरोगतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे ह्या मार्गदर्शन करतील. या सत्राचे अध्यक्ष सत्यशोधक समाज चंद्रपूरचे कार्यकर्ते हिराचंद बोरकुटे हे राहतील. दुसरे सत्र हे जनसंवादाचे राहील या सत्राचे अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ.सचिन भेदे राहणार आहेत. यामध्ये सहभागी गजानन धामणे (वाशिम), दादा ( देवाजी) तोफा,गडचिरोली, प्रा.जावेद शेख,नागपूर ॲड. दिपक चटप, विजय मुसळे, प्रा. अनिल डहाके, दुशांत निमकर, कविता मडावी, सुरेंद्र रायपुरे, नंदकिशोर शेरकी, जितेंद्र पिंपळशेंडे हे सहभागी राहणार आहेत. सोशल एज्युकेशन मुव्हमेंट व बिरसा क्रांती दलाचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय सत्र होईल व सामाजिक कार्यकर्ते जितेश कुळमेथे हे परिषदेमध्ये घेतलेल्या ठरावाचे वाचन करतील. अशी माहिती परिषदेचे संयोजक डॉ. राकेश गावतुरे यांनी दिली.