अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला आजन्म कारावासाची शिक्षा
*🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा*
📱 8830857351
चंद्रपूर : 16 डिसेंबर
पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीतील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 ऑक्टोंबर, 2020 रोजी जबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या 24 वर्षीय आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे अपराध कमांक 235/2020 कलम 376 (2), (अ), 506 भादंवि सहकलम 4, 5 (1) व 6 लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे यांनी करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता शनिवार 16 डिसेंबर रोजी कोर्ट विद्यमान अ.व्हि. दिक्षीत, विशेष सत्र न्यायाधिश चंद्रपूर यांच्या न्यायालयात आरोपी 24 वर्षीय कमलाकर भाऊजी राऊत यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सहा. सरकारी अभियोक्ता स्वाती देशपांडे आणि पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा निलरत्न उराडे पोस्टे. गोंडपिपरी यांनी कामगिरी बजावली.