पहाटेला कुटुंब शेतीच्या कामासाठी गेले शेतात आणि घराला लागली भीषण आग ११.५० लाखाचे झाले नुकशान मात्र आगीचे कारण राहीले गुलदस्त्यात

59
पहाटेला कुटुंब शेतीच्या कामासाठी गेले शेतात आणि घराला लागली भीषण आग ११.५० लाखाचे झाले नुकशान मात्र आगीचे कारण राहीले गुलदस्त्यात

पहाटेला कुटुंब शेतीच्या कामासाठी गेले शेतात आणि घराला लागली भीषण आग

११.५० लाखाचे झाले नुकशान मात्र आगीचे कारण राहीले गुलदस्त्यात

पहाटेला कुटुंब शेतीच्या कामासाठी गेले शेतात आणि घराला लागली भीषण आग ११.५० लाखाचे झाले नुकशान मात्र आगीचे कारण राहीले गुलदस्त्यात

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो.नं.9373472847✍️

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मौजा घुसाळा येथील गणेश बकाराम यांच्या घराला सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने घरातील सर्व सामान्यांची राख रांगोळी होऊन ११ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
माहितीनुसार गणेश राकडे पहाटे मात्र पत्नी व मुलासह घरातील कामे आटोपून सकाळ होताच शेतीचे कामे करण्याकरिता शेतात निघून गेले होते. दरम्यान त्याच्या घराला आग लागल्याचे घरा शेजारील लोकांना सकाळी १० वाजताच्या सुमारास लक्षात आले. या घटनेने गावात एकच खळबळ माजली. “आग लागली रे आग ” घटनेची माहिती आंधळगाव पोलीस स्टेशनला मिळाली.आंधळगाव पोलीस निरीक्षक , पोलीस पाटील , मंडळ अधिकारी, तलाठी , विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला. राखडे कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी धुसाळा ग्राम वासीयांनी केली आहे.
या आगीत गणेश राकडे यांच्या घरातील अन्नधान्यासह कपडे, कागज पत्रे , दागीने , रुपये असे सर्व काही जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अपुरे ठरत असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू दिसत होते.आग वाढल्याने घराशेजारील घरांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.
गावकऱ्यांनी तातडीने गावातील ट्रन्सफॉर्मावरून विद्युत पुरवठा बंद केला.मिळेल त्या साधनांनी आज विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र वीज पुरवठा बंद असल्याने बोरवेल वरून पाणी घेता आले नाही. परिणामतः गावकऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर मोहाडी येथील अग्निशामक दलाच्या पथकास प्राचारण करण्यात आले. मात्र आग विझवण्यास विलंब होत चालल्याने आगीचे रुद्र रूप वाढत चालले होते. अशातच मिळेल त्या साधनाने गावकऱ्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अग्निशामक पथक आल्यावर त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आगेवर नियंत्रण केले.