निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी विधिमंडळात व संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारायलाच पाहीजे . जनतेच्या समस्यांची दखल घेणाऱ्या लोकांनाच निवडून द्या – डॉ. नामदेव किरसान.

57
निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी विधिमंडळात व संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारायलाच पाहीजे . जनतेच्या समस्यांची दखल घेणाऱ्या लोकांनाच निवडून द्या - डॉ. नामदेव किरसान.

निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी विधिमंडळात व संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारायलाच पाहीजे .

जनतेच्या समस्यांची दखल घेणाऱ्या लोकांनाच निवडून द्या – डॉ. नामदेव किरसान.

निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी विधिमंडळात व संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारायलाच पाहीजे . जनतेच्या समस्यांची दखल घेणाऱ्या लोकांनाच निवडून द्या - डॉ. नामदेव किरसान.

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

गडचिरोली : दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी मौजा बाजीरावटोला (भाकरोंडी) ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे आदिवासी नाट्य कला मंडळ बाजीरावटोला च्या वतीने आयोजित “आधार कुणा मागू मी” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नाटकाच्या शीर्षकाचा उलगडा करताना सांगितले की, हवालदिल शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला शासन व प्रशासनानी आधार दिला पाहिजे. जनप्रतिनिधींनी महागाई , बेरोजगारी असो, धनाला न मिळणारा उचित दर असो, गरीब श्रीमंत यातील दरी वाढण्याची समस्या असो किंवा इतर स्थानिक समस्या असो, यांची दखल घेऊन आमदार खासदार सारख्या जनप्रतिनिधींनी विधिमंडळात व संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारायला पाहिजे. परंतु आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी आपली जबाबदारी पार पाडतांना दिसून येत नाहीत. त्यामुळे जनतेच्या समस्यांकडे जनप्रतिनिधींचे तसेच सद्यस्थित राज्यातील व केंद्रातील भाजप प्रणित सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. किंवा हेतूपुरस्सर त्यांच्याकडून तसे केले जात आहे. करिता जनतेने वेळीच सावध होण्याची गरज आहे. व अशा बेजबाबदार व निष्क्रिय लोकांना यापुढे निवडून न देता जनतेच्या समस्यांची जाणीव असणाऱ्या व त्यांची दखल घेणाऱ्या लोकांनाच निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ चंदेल, सहउद्घाटक भूषणभाऊ सातव, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलिंदभाऊ खोब्रागडे, गडचिरोली शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी गेडाम, लाडवेजी ठेकेदार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, स्वप्निलभाऊ ताडाम, प्रभुदासजी किरंगे, सरपंच मोहनजी हलामी, सुंदरजी नरोटे, दीप प्रज्वलक, आदिवासी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्वेश्वर दर्रो, डी.जे. करंगामी, विशेष अतिथी दिगंबरजी राऊत, नरेशजी टेंभुर्णे, तंटामुक्ती अध्यक्ष मोबिनजी शेख, मुन्नासिंह चंदेल, दिनेशजी कंगाले व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. हे खास आहे.