वणीत क्रिकेट सट्ट्यावर छापा; बिल्डलसह चौघे ताब्यात.

यवतमाळ:- वणी क्रिकेट सट्ट्यावर छापा टाकून बिल्डरसह चौघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी येथील गॅंगशेट्टीचवार मंगलकार्यालय परिसरातील बिल्डरच्या ऑफीसमध्ये करण्यात आली. या कारवाईपासून पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ वणीत ठाण मांडून आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे यवतमाळ येथे रुजू होताच त्यांनी अवैध व्यवसायाविरोधात मोर्चा उघडला. जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना आपल्या परिसरात असलेले अवैध धंदे बंद करा, असे फर्मान सोडले होते. तरीदेखील छुप्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरू असल्याचे या कारवाहीमुळे उघड झाले आहे. येथील वरोरा मार्गावर असलेल्या गॅंगशेट्टीवार मंगलकार्यालय परिसरात जम्मू खान या बिल्डरचे कार्यालय आहे.

याच कार्यालयात क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह दुपारी पाचच्या सुमारास आमेर बिल्डरच्या कार्यालयावर छापा टाकला. क्रिकेट सामन्यावर जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आल्याने बिल्डर जम्मू खान याला ताब्यात घेऊन मोमीनपुरा येथील बिल्डरचे घर गाठले. पोलिस वाहनाने वणी गाठल्यास सट्टा खेळणाऱ्या जुगारींना शंका येईल व माहिती लीक होईल, या भीतीने पोलिस पथकाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चक्क खासगी ट्रॅव्हल्सने वणी शहर गाठले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here