लाखनी तालुक्यातील मौजा जेवणाळा खेडेगावातील उच्चशिक्षित तरुणाला दुग्ध व्यवसायातून मिळाला हक्काचा रोजगार

54
लाखनी तालुक्यातील मौजा जेवणाळा खेडेगावातील उच्चशिक्षित तरुणाला दुग्ध व्यवसायातून मिळाला हक्काचा रोजगार

लाखनी तालुक्यातील मौजा जेवणाळा खेडेगावातील उच्चशिक्षित तरुणाला दुग्ध व्यवसायातून मिळाला हक्काचा रोजगार

लाखनी तालुक्यातील मौजा जेवणाळा खेडेगावातील उच्चशिक्षित तरुणाला दुग्ध व्यवसायातून मिळाला हक्काचा रोजगार

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्हा लाखनी तालुक्यातील मौजा जेवणाळा खेडेगावातील उच्चशिक्षित तरुणांनी रोजगार निर्मिती करिता शासनावर भरवसा न करता स्वतः पुढाकार घेऊन, पशु व्यवसाय सांभाळत दुग्ध व्यवसायातून हक्काचा रोजगार हाती घेऊन उभा केला. दररोज १०० लिटर दुधाच्या नियोजनाकरिता आदर्श दिनचर्या जोपासत आर्थिक हितही साधला आहे. हे किमया लाखनी तालुक्यातील मौजा जेवणाळा येथील नामे ज्ञानेश्वर उर्फ नाना बुरडे वय ३५ वर्षे या उच्चशिक्षित उमद्या तरुणाने केली आहे.
गेली काही वर्षे नवे रोजगार निर्माण होण्याची संख्या कमी होत चालली आहे. आणि रोजगारही कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ७.८३% रोजगार कमी झाले. मार्च महिन्यात रोजगार कमी होण्याची टक्केवारी ७.६० टक्के होती. असे सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनोमी सी.एम.आय.इ. या संस्थेने नुकत्याच प्रसिद्धी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरवर्षी दोन करोड नवे रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देऊन , सत्तेवर आलेल्या भाजप म्हणजे मोदी सरकारने , बेरोजगारांची आकडेवारी प्रसिद्ध करणे बंद केले असले तरी सी.एम.आय. इ.ची ही आकडेवारी सरकारचे रोजगार निर्मिती क्षेत्रातले अपयश पुरेसे स्पष्ट करणारी आहे. जे बे जबाबदार निर्णय घेतले गेले. जी भांडवलदार धार्जिणी, नफेखोरीला अमर्याद वाव देणारी धोरणे गेली. काही वर्षे या सरकारने राबविली . त्या साऱ्याच्या परिपाक म्हणजे ही वाढती बेरोजगारी आहे . आणि त्यामुळे देशातील ५०% हून अधिक लोक आजही हलाखीचे जीवन जगत आहे.
या ठिकाणी रोजगार कशाला म्हणावे ? ही गोष्ट निदान ढोबळ मानाने ठरविणे गरजेचे होते. आणि आपले माननीय पंतप्रधान म्हणतात “तसे भजी तळणे ” हा ही सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार होऊ शकेल. परंतु एखादा इंजिनियर जर भजी तळत असेल व तेल साबण अशा उत्पादनांचे मार्केटिंग करत नाईलाजाने गल्लीबोळातून फिरत असेल , तर त्या व्यक्तीकडे रोजगार आहे असे म्हणता येईल का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. रोजगार म्हणजे संबंधित व्यक्तीला त्याच्या क्षमतेप्रमाणे व शैक्षणिक अर्हतेप्रमाणे उत्पन्नाचे नियमित साधन असणे होय. ही व्याख्या जरी ढोबड असली तरी या व्यक्तीने बेरोजगारांच्या खरा आकडा कितीतरी जास्त आहे. ही गोष्ट लक्षात येऊ शकेल. बेरोजगाराची समस्या सर्वांची समस्या आहे. ती जशी उच्चशिक्षितांची आहे. तसेच अल्पशिक्षित आणि अशिक्षित यांचीही आहे. जशी कुशल कामगारांची आहे. तशीच ती अकुशल कामगारांचीही आहे. शहरी भागाची आहे. तशीच ती समस्या ग्रामीण भागाचीही आहे. ही समस्या त्यांची आहे. ज्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळत नाही. म्हणून मी रोजगार निर्मिती करिता शासनावर भरोसा न करता स्वतः चाच बिजनेस केले आहे. या रोजगारातून माझे कुटुंब सुखी आहे , व दोन पैसे मला मिळत आहे. आणि मी स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि या पशुपालन दुग्ध व्यवसायातून मला हक्काचा रोजगार मिळाला आहे. अशी प्राथमिक बातमी “मीडिया वार्ता न्युज “ला भंडारा जिल्ह्यातील मौजा जेवनाळा येथील उच्चशिक्षित युवकांनी दिली आहे.