मोदी सरकारच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे काम होत आहे – डॉ. नामदेव किरसान.

51
मोदी सरकारच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे काम होत आहे - डॉ. नामदेव किरसान.

मोदी सरकारच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे काम होत आहे – डॉ. नामदेव किरसान.

मोदी सरकारच्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे काम होत आहे - डॉ. नामदेव किरसान.

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

चंद्रपूर : दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी मौजा मोहाळी (मोकासा) ता. नागभीड जि. चंद्रपूर येथे एकता युवा कला मंच मोहाळी (मोकासा), यांच्या वतीने “पाषाण” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलेल्या विकासाच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, मोदी सरकार पुंजीपती धार्जीनी असून मुठभरपुंजीपतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था जी असंघटित क्षेत्रांवर अवलंबून आहे ती नोटबंदीच्या माध्यमातून उध्वस्त करण्याचे काम त्यांनी केले. नोटबंदी करून व जीएसटी आकारून असंघटित क्षेत्रातील 3 लाखापेक्षा जास्त लघु उद्योगधंदे बंद करण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली व मुठभर पूजीपतींच्या उत्पन्नात मात्र कितीतरी पटीने वाढ झाली. ही सरकार जनसामान्यांच्या हक्काचे हिसकावून घेऊन मुठभर पुंजीपतींचे घर भरत आहे. समाजात आर्थिक सामाजिक असमानता निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे जे अत्यंत घातक आहे. त्यामुळे याचा प्रतिकार करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उद्घाटक सतीशभाऊ वारजूकर समन्व्यक चिमुर विधानसभा, मा. नरेंद्रभाऊ हेमणे, संजयभाऊ माकोडे, शंकरभाऊ वारजुकर, तरबेज शेख, अध्यक्ष अल्पसंख्यक काँग्रेस नागभीड, प्रशांतभाऊ गेडाम शहर उपाध्यक्ष नागभीड, रिद्धेश्वरजी वारजुकर, अमृतजी शेंडे माजी सरपंच बाम्हणी, विनोदभाऊ नवघडे, ज्योत्सनाताई वारजुकर अध्यक्ष महिला काँग्रेस नागभीड, प्रशांतजी गेडाम, शालूताई चौधरी, रामाजी सहारे, सिने. भाऊराव डागे, सिने. नाजूक चांदेकर, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.