शेतात घुसली एसटी प्रवासी बस • सुदैवाने जिवीत हानी टळली

53
शेतात घुसली एसटी प्रवासी बस • सुदैवाने जिवीत हानी टळली

शेतात घुसली एसटी प्रवासी बस

• सुदैवाने जिवीत हानी टळली

शेतात घुसली एसटी प्रवासी बस • सुदैवाने जिवीत हानी टळली

*मीडिया वार्ता वृत्तसेवा*
📱 8830857351

चंद्रपूर, 19 डिसेंबर
चिमूर-कान्पा राज्यमहामार्गाची मागील वर्षभरपासून दैना झाली आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि राज्य परिवहन महामंडळाची बस थेट शेतात घुसली. बसमधील शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवार, 19 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. जखमींवर शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुळगुळीत रस्त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांच्यासह संतप्त जमावाने घटनास्थळी रास्तारोको आंदोलन सुरू केले.

• *गुळगुळीत रस्त्यासाठी संतप्त जमावाचा रास्तारोको*
• *बांधकाम विभागाविरोधात संताप*

चिमूर-कान्पा रस्त्याची मागील वर्षभरापासून दैयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करावी, यासाठी अनेकदा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. पण, अद्यापही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, मंगळवारी चिमूर आगाराची बस भंडारा येथे जाण्यासाठी निघाली. या बसमध्ये जवळपास 80 प्रवासी बसले होते. शंकरपूरपासून जवळच असलेल्या कवडशी(देश.) फाट्याजवळ खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट शेतात घुसली. या दुर्घटनेत बसमधील काही प्रवासी जखमी झाले. लागलीच त्यांना शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच डॉ. वारजूकर यांनी घटनास्थळी भेट दिली. लागलीच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी चक्काजाम आंदोलन सुरूच आहे.