निजामपूर विभागामधील मनसे व राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-रविवार दिनांक.१७/१२/२०२३ सायंकाळी ठीक ०६:०० वाजता निजामपूर बुद्ध विहारात निजामपूर विभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निजमपूर विभाग प्रमुख रामदास भाई सावंत व राष्ट्रवादीचे अरविंद गायकवाड व कु. स्वाती कांबळे यांनी निजमपूर मधील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा महासचिव सागर भालेराव साहेब यांच्यावर विश्वास दर्शवत रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रविंद्र चव्हाण सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला स्वीकार करून वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला सदर पक्ष प्रवेशाच्या वेळी काही राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील पक्षामध्ये प्रवेश केला असून निजामपूर विभागांमध्ये येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीला नवीन ऊर्जा प्राप्त झाली असून मनसे व राष्ट्रवादी ला मात्र निजामपूर विभागामध्ये खिंडार पडला आहे तरी या पक्षप्रवेशामुळे तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा कामकाजाचा बोलबाला सुरू व्हायला सुरुवात झाली असून वंचित बहुजन आघाडी मध्ये इन्कमिंग चालू झाल्याच्या चर्चा सर्वत्र पसरत आहेत त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा पक्षामध्ये महिलांची सक्षम कार्यकारणी उभी राहावी याकरिता भारिप बहुजन महासंघाच्या माजी रायगड जिल्हा अध्यक्ष की ज्या बराच वेळ दलित पॅंथर मध्ये काम करत होत्या अशा सौ. मायाताई आठवले त्यांनी देखील पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे व त्यांना देखील जिल्हा महिला समन्वयक पदाची जबाबदारी दिली असून महिला संघटन वाढवण्या करता जिल्हाभर काम करणे करिता सूचना दिल्या आहेत सदर पक्षप्रवेशाच्या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण सर रायगड जिल्हा महासचिव मा.सागर भालेराव रायगड जिल्हा सचिव मा.श्रीहर्ष कांबळे साहेब व माणगाव तालुका अध्यक्ष मा.रोहन साळवी साहेब उपस्थित होते