मुख्याधिकारी मेश्राम यांची हिटलर शाहीने मोहाडी नगर पंचायत झाली कबाळ
“मुख्याधिकारी हटाव ” मोहाडी नगर पंचायत बचाव ” मोहीमेला लवकरच होणार सुरुवात
नगर विकास संघर्ष समितीचा ठाम निर्धार
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगर पंचायत नेहमी आपल्या हिटलर शाही धोरणाने सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहे. घर टॅक्स वाढी बाबतचा ठराव बहुमताने नामंजूर झाला असताना सुध्दा जबरदस्तीने सामान्य जनतेला नोटीस देऊन बोलवण्याचे कारण काय? मुख्याधिकारी स्वतः च्या सहिने पत्र देतात. व ज्या तारखेला बोलावतात त्या दिवशी स्वतः हजर राहत नाही. असे मुख्याधिकारी का करतात ? मोहाडीच्या जनतेला मूर्ख बनविण्याचे काम मुख्याधिकारी करीत आहेत. नगर पंचायतच्या बॉडी पेक्षा अधिकारी मोठे नाही. आणि हे हेरिंग कशाची? जिल्हाधिकारी सांहेबाकडे कर वाढीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना हा कशाचा सोंगाडा मुख्याधिकारी मेश्राम यांनी लावला आहे ? असे मोहाडी येथील जनतेला वाटते आहे. संपूर्ण नगर पंचायत एकट्या तुमच्या मतानेच कां ‘ चालीत आहे ? भ्रष्टाचार करण्याकरीता मात्र आघाडीवर आहेत. तुमसर नगर परिषदची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी लावली आहे. त्याच बरोबर मोहाडी नगर पंचायतची ही दोन, चार दिवसांतच लागणार आहे. तरी देखील मुख्याधिकारी मेश्राम यांची हिटलरशाही कमी होतांना दिसत नाही. याच नेमकं कारण काय आहे ? असे मोहाडी येथील जनतेत चर्चा सुरु आहे. घरकुलाचे उर्वरीत पैसे केव्हा देणार? त्या करीता काही पाठपुरावा केला का? असा प्रश्न नगर विकास संघर्ष समितीने केला आहे.
आठ दिवसाच्या आत हे सर्व सोंगाडे बंद करा. हिटलर शाही चालविने बंद करा. पिडीत गोरगरिबांचे अडलेले काम पूर्ण करा. असे नगर विकास संघर्ष समितीने समजूत दिल्यावरही मुख्याधिकारी मेश्राम यांची हिटलरशाही मात्र कमी होताना दिसत नाही. नगर पंचायतीला कबाळ खाना बनविण्यात मुख्याधिकारी सर्वश्री जवाबदार आहे. ” हि नगर पंचायत की कबाळ खाना “अशी परिस्थिती बनवून ठेवलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक द्या…. पोलीस प्रोटेक्शन बोलावून सामान्य जनतेवर दबाव आणने बंद करा… ही मोहाडी आहे लक्षात ठेवा.. तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय नगर विकास संघर्ष समिती स्वस्त बसणार नसल्याचे खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, आदर्श बडवाइक, जयराम गायधने, अनतराम मेश्राम , हंसराज नीमजे, काशीनाथ रंभाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.