भंडारा जिल्हा एकता कलाकार असोसिएशनची मागणी रजिस्ट्रेशन नसलेल्या लावणी शो , डान्स गृपला परवानगी देण्यात येऊ नये. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार ,पोलीस स्टेशनला दिले निवेदन

56
भंडारा जिल्हा एकता कलाकार असोसिएशनची मागणी रजिस्ट्रेशन नसलेल्या लावणी शो , डान्स गृपला परवानगी देण्यात येऊ नये. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार ,पोलीस स्टेशनला दिले निवेदन

भंडारा जिल्हा एकता कलाकार असोसिएशनची मागणी

रजिस्ट्रेशन नसलेल्या लावणी शो , डान्स गृपला परवानगी देण्यात येऊ नये.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार ,पोलीस स्टेशनला दिले निवेदन

भंडारा जिल्हा एकता कलाकार असोसिएशनची मागणी रजिस्ट्रेशन नसलेल्या लावणी शो , डान्स गृपला परवानगी देण्यात येऊ नये. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार ,पोलीस स्टेशनला दिले निवेदन

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील ” एकता कलाकार असोसिएशन भंडारा जिल्हा ” व एकता कलाकार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मा. राजेश वासनिक यांनी दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा अधिकारी , पोलीस अधीक्षक मा.रोहित मतांनी , नायब तहसिलदार , पोलीस स्टेशन भंडारा यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात रजिस्ट्रेशन नसलेला लावणी शो , डान्स गृपला कार्यक्रम घेण्याची परवानगी देण्यात येऊ नये. अशी मागणी भंडारा जिल्हा एकता कलाकार असोसिएशन ने केली आहे.
मागील काही दिवसा अगोदर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गोबरवाही या गावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्लील डान्सच्या हैदोस घालण्यात आल्याचे समोर आला आहे. या कार्यक्रमात अश्लीलतेचा कळस गाठण्यात आल्याचे दिसून आले. त्यासंबंधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला आहे. पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी पोलीस ठाण्याचे हद्दीतील गोबरवाही इथे मंडई निमित्त आयोजित हंगामा कार्यक्रमात विवस्त्रअवस्थेतील अश्लील डान्स करण्यात आले होते. या अश्लील डान्स व्हिडिओ मुळे समाजावर खूप मोठा प्रचंड परिणाम पडला आहे. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आर के डान्स हंगामा गृपच्या पाच जनाविरुद्ध कलम ३५४, ३५४ ब, २९४, ५०९ , भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यात अशाच पद्धतीने अश्लील डान्सचे प्रकार घडले होते. तेव्हा पोलिसांनी तपासासाठी एस. आय. टी. ची स्थापना केली होती. मात्र दोषींवर ठोस कारवाई न झाल्यामुळे असेच प्रकार भंडारा जिल्ह्यात होत असल्याचे समोर आले आहे.
म्हणून भंडारा जिल्हा एकता कलाकार असोसिएशन यांनी भंडारा जिल्ह्यात पुन्हा असे गैरकृत्य होऊ नये , अश्लील चाळे करताना कोणताही डान्स ग्रुपच्या माध्यमातुन अश्लील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होऊ नये. म्हणून एकता कलाकार असोसिएशन भंडारा जिल्हा यांनी रजिस्ट्रेशन नसलेल्या लावणी शो , डान्स ग्रुपला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.
या मागणीसाठी निवेदन देताना ” एकता कलाकार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मा. राजेश वासनिक , कोषाध्यक्ष मा. नितीन पराते , सदस्य मा.रिक्की राजपूत , मा. आबीद शेख , मा. सोनू हटवार , मा. जफर अली , मा. नंदू नंदागवळी , मा. रोहण रनसुरे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.