कळमना येथे घरोघरी महिलांच्या नावाने मालमत्ता क्रमांक पाटी.
उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने अभियानाला सुरूवात.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे महिलांच्या नावाने घरोघरी मालमत्ता क्रमांक पाटी लावा अभियानाला कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आले.
कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जातात. समाजामध्ये महिलांना न्याय व हक्क देण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच धर्तीवर कळमना येथे महिला च्या नावाने घरोघरी मालमत्ता क्रमांकाच्या पाटी लावा अभियान राबविण्यात आले आहे. जेणेकरून महिलांना समसमान वागणूक देऊन महिलाचा सन्मान वाढविण्यासाठी मदत होईल. त्यांचे सबलीकरण व सक्षमीकरण होण्यासाठी मदत होईल असे मत सरपंच नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केले आहे.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामपंचायत सदस्य रंजना दिवाकर पिंगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेळे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर कवडु पिंगे, मारोती अटकारे, अरुण आसवले, दौलत विददे, महादेव उमाटे, श्रावण कुचनकर, शकुंतला पिंगे, संगिता अटकारे,उषा अटकारे, सुमित्रा विददे, मंजुषा आसवले शिपाई विशाल नागोसे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.