धम्म पदयात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत
🖋️ रोशन लोणारे 🖋️
चंद्रपूर प्रतिनिधी
📱 9130553551 📱
21 डिसेंबर
बौद्ध धम्माचा ऐतिहासिक महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी 100 भिक्खु, श्रामणेर संघ तसेच भारत व थायलंड येथील उपासकांचा समावेश असलेलल तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा दि.20 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. आश्रय सेवाभाी संस्था, त्रिरत्नभूमी सोसायटी व गगन मलिक फाऊंडेशनच्यावतीने या तिस-या ऐतिहासिक धम्मपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मपद यात्रेत सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय उपासकांचे थायलंड भूमीत भव्य स्वागत करण्यात आले.