ग्रामीण घरकुलांचे अनुदान शहरी भागाप्रमाणे देण्यात यावे अशी लाभार्थ्यांकडून मागणी सावकारांकडे सोने गहाण ठेवूनही घरकुल लाभार्थ्यांचे घर पूर्ण होत नाही जुन्या अनुदानात बांधकाम पूर्ण होण्यास अडचण, तर बांधकाम साहित्य महागले, घराचे स्वप्न अपूर्ण

77
ग्रामीण घरकुलांचे अनुदान शहरी भागाप्रमाणे देण्यात यावे अशी लाभार्थ्यांकडून मागणी सावकारांकडे सोने गहाण ठेवूनही घरकुल लाभार्थ्यांचे घर पूर्ण होत नाही जुन्या अनुदानात बांधकाम पूर्ण होण्यास अडचण, तर बांधकाम साहित्य महागले, घराचे स्वप्न अपूर्ण

ग्रामीण घरकुलांचे अनुदान शहरी भागाप्रमाणे देण्यात यावे अशी लाभार्थ्यांकडून मागणी

सावकारांकडे सोने गहाण ठेवूनही घरकुल लाभार्थ्यांचे घर पूर्ण होत नाही

जुन्या अनुदानात बांधकाम पूर्ण होण्यास अडचण, तर बांधकाम साहित्य महागले, घराचे स्वप्न अपूर्ण

ग्रामीण घरकुलांचे अनुदान शहरी भागाप्रमाणे देण्यात यावे अशी लाभार्थ्यांकडून मागणी सावकारांकडे सोने गहाण ठेवूनही घरकुल लाभार्थ्यांचे घर पूर्ण होत नाही जुन्या अनुदानात बांधकाम पूर्ण होण्यास अडचण, तर बांधकाम साहित्य महागले, घराचे स्वप्न अपूर्ण

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मांडेसर ) दिनांक २३ डिसेंबर २०२३ भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मौजा मांडेसर , रामपूर , खुटसावरी , खमारी बुज. पिंपळगाव , नेरी , सातोना , पाचगाव, पाहुनी , टाकळी , भोसा , चोरखमारी , पारडी जि.प. क्षेत्र व पं.सं. क्षेत्रात ग्रामीण व शहरी भागातील गरजू व गरीब नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी शासन घरकुल योजना राबवित आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण घरकुल बांधकामासाठी केवळ १ लाख २० हजार रुपयांच्या अनुदान दिले जाते. बांधकाम साहित्य महागल्याने बांधकामासाठी आर्थिक भार सहन करावा लागतो. शासनाने शहरी घरकुल या प्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी मोहाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
नगर परिषदेच्या माध्यमातून शहरी भागात २ लाख ४० हजार तर ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण भागात १ लाख २० हजार रुपये असे घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते.
मात्र दिवसेंदिवस घर बांधण्यासाठी विटा, रेती, सिमेंट , ठेकेदार , मजूरी व लोखंडाचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घराचे स्वप्न रंगवणाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. १ लाख २० हजारांत २ खोल्यांचे बांधकाम शक्यच नाही.
शासनाने शहरी भागात घरकुल धारकांना २ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलासाठी अनुदान द्यावे , अशी मागणी ग्रामीण भागात मात्र जोर धरत आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत १८ हजार रुपये मिळतात. त्यामुळे घर बांधायचे तरी कसे ? असा प्रश्न सर्व जनतेचे कडून उपस्थित केल्या जात आहे. विशेष म्हणजे घरकुलाचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना एका टप्प्याची काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाते. मात्र महागाई व बांधकामाच्या वाढलेल्या दरामुळे अनेकांची बजेट पहिल्या टप्प्यात कोलमडून जात आहे. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळवी केल्यानंतर घरकुलाच्या कामाला मंजूरी मिळते.
पण पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देण्यात येते.शासनाकडून मिळणारे १ लाख २० हजार आणि १८ हजार रुपयांत घर बांधणे शक्य आहे का ? त्यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न अर्धवट राहत असल्याचे चित्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. म्हणूनच घरकुल लाभार्थी मात्र आपले घरातील सोने गहान ठेऊन सावकारांकडून कर्ज घेत असल्याचे चित्र दिसून आले आहे. जसे शासनाने शेतीचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. तसेच कर्ज सावकारांच्या सुद्धा माफ करावे जेनेकरूण गरीबांचा गहान ठेवलेला सोना परत मिळण्यास साह्य होईल. अशी घरकुल लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. आणि सोबतच शासनाने ग्रामीण भागातील घरकुलांच्या अनुदानात वाढ करावी अशी विनंती केली आहे.