मौजा सोनूली येथे चारित्र्याच्या संशयावरून बहिण भावाचे झाले शाब्दीक वाद, शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने भावाने नाका तोंडावर बुक्क्या हानूण आवळला बहिनीचा गळा

57
मौजा सोनूली येथे चारित्र्याच्या संशयावरून बहिण भावाचे झाले शाब्दीक वाद, शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने भावाने नाका तोंडावर बुक्क्या हानूण आवळला बहिनीचा गळा

मौजा सोनूली येथे चारित्र्याच्या संशयावरून बहिण भावाचे झाले शाब्दीक वाद,

शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने भावाने नाका तोंडावर बुक्क्या हानूण आवळला बहिनीचा गळा

मौजा सोनूली येथे चारित्र्याच्या संशयावरून बहिण भावाचे झाले शाब्दीक वाद, शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने भावाने नाका तोंडावर बुक्क्या हानूण आवळला बहिनीचा गळा

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी भंडारा जिल्ह्यातील वरठी लगतच्या मौजा सोनूली या गावात घडली. सविस्तर असे की, चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत पोहचले, अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठी लगतच्या सोनूली येथे घडली. वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे वय (२२ वर्षे ) याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे वय (२० वर्षे ) असे मृत बहिणीचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनूली या गावात रविवारी घडलेली ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. 
सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे हे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरीचे कामे करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हान ला कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघेही भाऊ बहिण घरी होते.
दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की, आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हाणल्या. एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता. दरम्यान, पोलीस पाटीलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्याच्या खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली. व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.
अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत होती. १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी २२ तारखेला आपल्या स्वगावी सोनूली येथे आली होती. पुढील तपास वरठी पोलीस स्टेशन करीत आहे.