पत्रकार प्रमोद जाधव “माणगांव रत्न”पुरस्काराने सन्मानित.

54
पत्रकार प्रमोद जाधव "माणगांव रत्न"पुरस्काराने सन्मानित.

पत्रकार प्रमोद जाधव “माणगांव रत्न”पुरस्काराने सन्मानित.

पत्रकार प्रमोद जाधव "माणगांव रत्न"पुरस्काराने सन्मानित.

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष तसेच माणगांव मधील “मुक्त पत्रकार” प्रमोद जाधव यांना माणगांव छावा प्रतिष्ठान आयोजित “माणगांव महोत्सव या कार्यक्रमात ” माणगांव रत्न ” या पुरस्काराने २४ डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात आले आहे.छावा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष निलेश थोरे यांच्याकडुन सदर पुरस्काराचे नामांकन पारीत करण्यात आले होते.
२०१६ पासून डिजीटल व व वेब मीडिया त्यानंतर २०१८ पासून प्रिंट तसेच टीव्ही व सामाजिक माध्यमे यांच्या मार्फत अनेक ज्वलंत सामाजिक प्रश्न यावर रोख-ठोक लेखणी, चित्रफीत सामाजिक माध्यमाद्वारे ह्या सामाजिक समस्यांवर आवाज उठविणे,समाजातील आर्थिक दुर्बल घटक,वंचित घटक यांना कोरोना काळात योग्य न्याय मिळवून देणे या कार्यकरीता प्रमोद जाधव यांना हा २०२४ चा “माणगांव रत्न” पुरस्कार देण्यात आल्याचे छावा प्रतिष्ठान संस्थापक निलेश थोरे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
तसेच पत्रकार प्रमोद जाधव यांच्या भेटल्या विमुक्त जमाती ,जाती यांच्यासाठी विशेष केलेल्या कार्याबद्दल त्यांना २०२२ साली रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तसेच शासन आणि प्रशासन यामध्ये दुवा म्हणून काम करत असल्याची दखल घेत २०२३ साली पोलीस प्रवाह कडून “आदर्श पत्रकार” पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.यावर्षी मिळालेल्या “माणगांव रत्न” पुरस्कारामुळे पत्रकार प्रमोद जाधव यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.