नगरपंचायत मोहाडी येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हुतात्मा स्मारक येथे संपन्न
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गाजलेली तहसिल मोहाडी नगर पंचायत येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाभियान पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन आज हुतात्मा स्मारक, मोहाडी येथे संपन्न झाले.
या सोहळ्याला मुख्य अतिथि म्हणून खासदार श्री. सुनीलजी मेंढे, *सोहळ्याचे अध्यक्ष आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे,* सोहळ्याचे उद्घाटक डॉ. परिणयजी फुके होते.
या पाणीपुरवठा योजनेचा काम २ वर्षात पूर्ण होणार असून या योजनेमुळे मोहाडी शहराला शुद्ध पाणी पुरवठा होईल आणि यातून खूप दिवसांपासून मोहाडी वासियांची सततची असलेली शुद्ध पाणी न मिळण्याची प्रमुख समस्या दूर होईल. असे प्रतिपादन आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी मोहाडी वासीयांना केले.
या भूमिपूजन सोहळ्याला
सौ. छायाताई डेकाटे नगराध्यक्षा, न.प. मोहाडी श्री. सचिनजी गायधणे उपाध्यक्ष, न.प. मोहाडी
सौ. देवश्रीताई शहारे पाणीपुरवठा सभापती, सौ. दिशाताई निमकर सार्व. बांधकाम सभापती, सौ. सुमनताई मेहर महिला व बालकल्याण सभापती,
श्री. पवनजी चव्हाण नगरसेवक,
श्री. महेशजी निमजे नगरसेवक,
श्री. ज्योतिषजी नंदनवार नगरसेवक,श्री. यादोरावजी कुंभारे नगरसेवक, सौ. अश्विनी ताई डेकाटे नगरसेविका, सौ. वंदनाताई पराते नगरसेविका, सौ. रेखाताई हेडाऊ नगरसेविका ,सौ. मनीषाताई गायधणे नगरसेविका, सौ. पूनमताई धकाते नगरसेविका, सौ. सविताताई साठवणे नगरसेविका,श्री. हेमचंदजी पराते नगरसेवक,
श्री. शैलेश गभणे नगरसेवक ,
आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.