गांजा तस्कर शिताफीने पकडण्यास नेरळ पोलिसांना यश; धडाकेबाज शिवाजी ढवळे यांची सिंघम कामगिरी

55

✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

 नेरळ : – दिनांक २६ डिसेंबर २३ रोजी नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत निर्माण नगरी परिसरातील निर्माण प्लाझा समोरील रोडवर मोकळ्या जागेत दोन इसम अमलीपदार्थ घेऊन विक्री साठी येणार असल्याचे गुप्त माहिती नेरळ पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी सकाळ पासून सापळा रचला व रात्री ९ च्या सुमारास दोन इसम स्वंशयीत रित्या आढळून आले त्यांची चौकशी व झडती घेतले असतांना त्यांची नावे धर्मेंद्र कंचन चौहान राहणार कल्याण तर दुसरा शिवसिंग बाकेलाल चौहान राहणार देवगाव चाळ कल्याण यास ताब्यात घेतले त्यांच्या फिक्कट खाकी रंगाचे पिशवीमध्ये गुंडाळलेले पाकीट सापडले व त्यातून काड्या ज्यातून उग्र वास येत होता उघडून पहिले तर त्यात गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे जवळील गांजा यांचे वजन वजन केले असता ४ किलो ००२ ग्राम भरले.

मार्गदर्शन मा. पोलीस उप विभागीय अधिकारी कर्जत श्री. विजय लगारे सो यांचे मार्गदर्शनाखाली व पो.नि. कर्जत श्री. सुरेंद्र गरड यांचे सोबत नेरळ पोलीस ठाण्यात नेरळ गुन्हा रजि. नं.329/2023 NDPS कायदा कलम 8(क), 20(ब) ii(ब), 29 प्रमाणे गुन्हाची नोंद केली आहे. शिवाजी ढवळे व पोलीस किसवे तसेच निलेश वाणी व नेरळ पोलीस टीमचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे. तसेच कार्य तत्पर शांतता कायदा व सुव्यवस्ता राखण्यात श्री शिवाजी ढवळे राखत असून त्यांचे नेरळ वाशियानकडून विशेष आभार मानले जात आहेत व त्यान्या सिंघम असे हि बोलले जात आहे.