सौंदड़ लोहिया विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती संपन्न.

112

सौंदड़ लोहिया विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती संपन्न.

सौंदड़:- येथिल लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, प्रमुख अतिथी प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे उपस्थित होते.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, प्रमुख अतिथी प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांनी “स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावरून प्रेरणा घेऊन आपले करीअर घडवावे” असे मोलाचे मार्गदर्शन केले.  याप्रसंगी सहाय्यक शिक्षक व्ही.एफ.घनमारे, जी.एस. कावळे, कु. यु. एस.जुमडे, डी. आर. दिघोरे यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी गीत व भाषणांतून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.यु.बी.डोये यांनी केले तर आभार स. शि.-डी.ए.दरवडे यांनी मानले.