कळमना येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा कळमना येथे असून दररोज प्रार्थना केली जाते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजींच्या विचारांची गरज आजच्या तरुण पिढीला पटवून देणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या युगात तरुण वर्ग हा व्यसनांमध्ये गुंतलेला आहे. जिवनात ध्येय साध्य करण्यासाठी महाराजांच्या विचारांची कास धरली तरच आयुष्य सुखमय करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी महादेव ताजणे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, दत्तु पिंपळशेंडे सचिव गुरुदेव सेवा मडळ, पुंडलिक पिंगे जेष्ठ सदस्य गुरुदेव सेवा मंडळ, ह भ प मिननाथ महाराज नाराडा, रामदास भोयर महाराज तोहगाव, बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील, कौशल्य मनोहर कावळे, उपसरपच, रंजना दिवाकर पिंगे ग्रामपंचायत सदस्य, महादेव आबिलकर सदस्य गुरुदेव सेवा मडळ, भाऊजी वाढई माजी पोलीस पाटील, महादेव पिंगे, लटारी बल्की, गणपती कुकडे, अशोक कावळे, आनंदराव बोढाले, विठ्ठल वाढई, शंकर गेडाम, उध्दव आस्वले, उध्दव ताजणे, वसंता सपाट, एकनाथ इदे, प्रभाकर वाढई, नानाजी आबिंलकर, रावजी गौरकार, सुरेश गौरकार, सुनील बोढाले, भाऊराव कावळे, दिवाकर वाढई, मदन वाढई, अमोल कावळे, विठ्ठल विददे, भुषण ताजणे सुरेश आत्राम, शामराव चापले, शकुंतला पिंगे, कुंदा बल्की, ताराबाई वाढई, संगीता अटकारे, संगीता ताजणे, मिराबाई वाढई, बोढे बाई, भारुड भजन मंडळ निंबाळा, भारुड भजन मंडळ चिंचोली खु. यासह गावकरी उपस्थित होते.