मोहाडी येथील घर टॅक्स कमी करण्याकरता अपील करा, निवेदनाद्वारे नगर विकास संघर्ष समिती व मोहाडी वासियांची मागणी
अन्यथा नगर विकास संघर्ष समिती मोहाडी वासियासोबत मोहाडी शहर कडकडीत बंद ठेवून आमरण उपोषण करण्याचा इशारा
✍️ राम राऊत मोहाडी तालुका ग्रामीण प्रतिनिधी📱7517204984📞
मोहाडी : आज दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी मोहाडी नगरवासी व नगर विकास संघर्ष समितीने निवेदन सादर केले. मोहाडी येथील नगर पंचायत ने काही दिवसापूर्वी घर टॅक्स मधे अवाढवी रकमेत वाढ करून मोहाडी वासियांना जबर झटका दिलेला होता. नगर विकास संघर्ष समितीने पुढाकार घेऊन मोहाडी नगर वासियांना सोबत घेऊन हजारोंच्या संख्येत मोहाडी नगर पंचायत वर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता. नगराध्यक्ष मॅडम यांनी मोर्चाची दखल घेत विशेष बैठक बोलावून दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी एकमताने ठराव नामंजूर करण्यात आला. पण मुख्याधिकारी यांनी हिटलर शाही दाखवीत ठरावा विरोधात मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सदर ठराव निलंबित करण्यासाठी अर्ज केल्यामुळे दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांनी तो ठराव निलंबित केला. त्या आदेशा विरोधात महाराष्ट्र नगर परीषद व ओद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ पोटकलम (३) नुसार मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक. नगर परिषद प्रशासन विभाग, आयुक्त कार्यालय नागपूर यांचेकडे एक महिनाच्या आत अपील करणे बंधनकारक असताना सुद्धा नगर पंचायतने अशी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
नगराध्यक्ष मॅडम यांनी अपील करण्याकरीता विशेष सभाबोलावून,नागरिकांवरील वाढलेला मालमत्ता कर कमी करण्याचा ठराव घेऊन, अपील करण्याची कृपा करावी.
अन्यथा मोहाडी शहरातील नागरिक व नगर विकास संघर्ष समिती संपूर्ण मोहाडी शहर कडकडीत बंद ठेवून नगर पंचायत समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला असुन याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील. अशा इशारा खुशाल कोसरे, रफीक (बबलू) सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, नारायण निखारे, आदर्श बडबाईक, रमेश गोंडाणे, अविनाश पेशने, गणेश नीमजे, सुभाष भाजीपाले, अनंतराम मेश्राम, नितिन निंबार्ते, गणेश पात्रे, दिवाकर बोकडे, प्रकाश मारबते, अजय वणवे, गुणवंत भोंडे, विनोद नंदनवार, रामप्रसाद मानकर, विनोद बभरे, हनेष महालगावे, किशोर लांजेवार, साहिल मदनकर, गणेश सेलोकर, मनोज नीमजे, सम्यक बागडे, बबलू शेख, आस्तिक घडले, सुरेश बावनकर, हंसराज नीमजे, रवि पाटील, अनिल टीचकुले, कैलाश खलोदे, भीम बारई, हेमंत मेहर, काशीनाथ रमभाड यांची उपस्थिती होती.