भीषण अपघात जागीच दोघां चा मृत्य
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं मो 9096817953
नागपुर. नागपूर-अमरावती मार्गावरील आठवा मैल भागात दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यात, कार चालक व एक महिला मृत्युमुखी पडले असून, मागच्या सीटवर बसलेली एक महिला गंभीर जखमी झाली आहे.अपघातग्रस्त कारमधील कुटूंब अंजनगाव सुर्जी येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
ही कार अमरावतीच्या दिशेने जात असताना अती वेगात असल्याने रस्ता दुभाजकावर धडकली व अनियंत्रीत होऊन नागपूर दिशेला जाणाऱ्या मार्गावर पलटली. तेव्हाच नागपूरकडे जात असणाऱ्या एका ट्रकवर ती धडकली. यात कारचालक व एक महिला समोरच्या सीटवर असल्याने जागीच मृत झाले. मागील सीटवर असणारी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. गाडी पूर्णपणे चकनाचूर झाली असून, स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे.