उपक्रमशील शिक्षकांना विनोबा अॅप पुरस्काराने केले सन्मानित प्रत्येक महिन्यात होणार निवड, जिल्हा परिषदेकडून गौरव

उपक्रमशील शिक्षकांना विनोबा अॅप पुरस्काराने केले सन्मानित प्रत्येक महिन्यात होणार निवड, जिल्हा परिषदेकडून गौरव

उपक्रमशील शिक्षकांना विनोबा अॅप पुरस्काराने केले सन्मानित

प्रत्येक महिन्यात होणार निवड, जिल्हा परिषदेकडून गौरव

उपक्रमशील शिक्षकांना विनोबा अॅप पुरस्काराने केले सन्मानित प्रत्येक महिन्यात होणार निवड, जिल्हा परिषदेकडून गौरव

✍️ गणेश कुमार चोपकर भंडारा तालुका ग्रामीण प्रतिनिधी📱8788151778📞

भंडारा : जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी समारंभात पाच शिक्षकांना नोव्हेंबर २०२३ चे जिल्हास्तरीय विनोबा अॅप पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ आणि तीन शिक्षकांना एफएलएन मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब ,शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के ( प्राथमिक ), शिक्षण सभापती रमेश पारधी, व सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. विनोबा ( बा ) अँपच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत ” किलबिल ” मुक्त मंच एफएलएन मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान उपक्रम इत्यादी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी लाखनी तालुक्यातील सतीश चिंधालोरे , पवनी तालुक्यातील मृणाली मोटघरे , या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. भंडारा जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या एफएलएन मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियाना अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालई बु.तालुका साकोली , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी तालुका मोहाडी , आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा तालुका साकोली, या तीन शाळांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक तालुकास्तरावर एक शाळेला प्रोत्साहन पर पुरस्कार देण्यात येणार आहेत. याप्रसंगी कुर्तकोटी यांनी सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्य करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाला ओपन लिंक फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक गणेश शेंडे आणि सर्व शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.
विनोबा अॅपचे जिल्हा समन्वयक गणेश शेंडे यांनी भंडारा तालुक्यातून एफएलएन पुरस्कारासाठी निवड झालेल्या सोनेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन कार्यरत शिक्षक वामन गुरवे यांना सन्मानित केले. हे मात्र खास.