नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा • सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांचे आवाहन • महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख निर्णय

नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा • सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांचे आवाहन • महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख निर्णय

नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा

• सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांचे आवाहन
• महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख निर्णय

नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा • सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांचे आवाहन • महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख निर्णय

*🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा*
📱 8830857351

चंद्रपूर : 6 जानेवारी
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३’ राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आलेली आहे.

ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात अर्ज करता येतील. अर्जाचा नमुना या विभागाच्या संकेतस्थळावर (igrmaharashtra.gov.in) तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे.

अभय योजना २०२३ विषयी सविस्तर माहिती
विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय किंवा दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधन्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांनी केले आहे.