श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तालुक्यातील 350 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
✒️नंदकुमार चांदोरकर.
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048
माणगांव : – श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परिक्षेसाठी तालुक्यातील 350 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, या परिक्षेचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड व बैसाणेसर तसेच दिपक पाटील यांनी केले होते.या परिक्षेचे बैठक व्यवस्था साठी न्यु ईंग्लिश स्कूल मुख्याध्यापक प्रकाश हाकेसर तसेच कांबडीसर, वसावे सर, मोरे सर व कर्मचारी वर्गामध्ये जंगम व देवकांत यांनी संस्थेला उत्तम सहकार्य केले, तसेच तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक यांनी परीक्षक म्हणून उत्तम काम केले.परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून ही परीक्षेचे आयोजन करुन स्पर्धा परीक्षा काय असते व कशा पद्धतीने दिली जाते व स्पर्धा परीक्षेचे महत्त्व काय असते हे जाणून घेऊन आम्हाला खूप छान वाटले व अशा प्रकारच्या परिक्षा दर वर्षी या संस्थेच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे.यातुन आम्हाला एम. पी. एस. सी परीक्षा देणे सोईस्कर होणार आहे या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली.या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांना विचारले असता गेली कित्येक दिवस या स्पर्धा परीक्षेचे नियोजन केले आहे आणि आमच्या संस्थेचे सदस्य यांनी देखील या परिक्षेसाठी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था करुन देणे, पाणी,खाऊ,नावे तपासून पाहणे आदी कामे केली आहेत.तसेच विषेश सहकार्य गटशिक्षणाधिकारी संतोष दौड यांनी केले, बैसाणेसर यांनी प्रश्न पत्रिका कशा प्रकारे असणार आहेत, प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, विद्यार्थी संख्या यादी करणे, क्रमांक टाकणे, यादी तयार करणे, विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.व आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे की तालुक्यातील एक तरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस अधिकारी घडावा.आणि या प्रकारे स्पर्धा परीक्षा दर वर्षी होणार आहेत असे आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.