क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा लढा महिलांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी -डॉ. अभिलाषा गावतुरे

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 जानेवारी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती फीस्कुटी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सावित्रीमाईंच्या लढ्याची विस्तृत मांडणी केली. सावित्रीबाईंचा लढा हा केवल महिलांचे भौतिक रूप बदलण्यासाठी नाही तर त्यांच्या संपूर्ण सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी होता सावित्रीबाईच्या लढ्यातून अधिकार संपन्न झालेल्या महिलांनी आपले जीवन केवळ बाहेरून बदलू नये तर आपल्या संपूर्ण सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले अंतरंग बदलून समतावादी आणि प्रगतिशील विचारधारेचा अवलंब करावा असे प्रतिपादन केले.
सावित्रीमाईंनी आणि ज्योतिराव फुले यांनी महिलांसाठी केलेल्या अद्वितीय त्यागामुळेच आज आपण त्यांची जयंती दसरा, दिवाळी पेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी करतो असे त्या म्हणाल्या. सन १८४८ ला सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी सुरू केलेल्या शाळा आज बंद करण्याचे षडयंत्र शासक वर्गाद्वारे केल्या जात आहे त्याला शाळा बचाव अभियानातून हाणून पाडण्याचे आवाहन सुद्धा डॉ.अभिलाषा यांनी केले. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून बेंबाळचे दीपक पाटील वाढई होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुसदचे डॉ. समीर कदम, गुरु चौधरी हजर होते. यावेळी मंचावर डॉ. राकेश गावतुरे, सरपंच अनिल निकेसर सुधीर मोहूरले,नेताजी जेंगठे, मानकर सर पुरुषोत्तम वाढई दिनेश वंजारी, रोहित निकुरे, इंद्रायणी शेंडे आभार शेख मॅडम यांनी केले तर संचालन शेंडे सर यांनी केले.