आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना पाया खालील डब्बा पडला.त्यानंतर तो खाली भिंतीवर आदळल्याने डोक्याला जबर मार लागला. त्यात त्याच्या मृत्यू झाला
त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं
मो 9096817953
नागपूर . डॉ.आंबेडकर नगर रामजी चौक येथे एका व्यक्तीने राहत्या सीलिंग पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना पाया खालील डब्बा पडला.त्यानंतर तो खाली भिंतीवर आदळल्याने डोक्याला जबर मार लागला.यात त्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली.
उमेश मोहनलाल पटले (वय-४२) रा. डॉ.आंबेडकर नगर रामजी चौक, वाडी असे मृताचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी उमेशची पत्नी व दोन्ही मुले एका वाढदिवस कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेले होते. दरम्यान उमेशने सीलिंग पंख्याला दुपट्ट्याने गळफास तयार केला.
खुर्चीवर डबा ठेवून तो चढायला लागताच डबा घसरला. यामुळे तो भिंतीवर आढळला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. तो तसाच पडून राहिला. रात्री पत्नी व मुले घरी उशिरा आले, तेव्हा तो खाली पडलेला दिसला. पत्नीने आरडा-ओरड केली. आजूबाजूचे लोक जमा झाले व त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उमेशला मृत घोषित केले.