रहदारीस अडथळा निर्माण करणे त्या 10 हातठेलेधारकाना आले अंगलट, गुन्हा दाखल • ‘संडे मार्केट’ मध्ये सक्त कारवाईचे निर्देश

रहदारीस अडथळा निर्माण करणे त्या 10 हातठेलेधारकाना आले अंगलट, गुन्हा दाखल • ‘संडे मार्केट’ मध्ये सक्त कारवाईचे निर्देश

रहदारीस अडथळा निर्माण करणे त्या 10 हातठेलेधारकाना आले अंगलट, गुन्हा दाखल

• ‘संडे मार्केट’ मध्ये सक्त कारवाईचे निर्देश

रहदारीस अडथळा निर्माण करणे त्या 10 हातठेलेधारकाना आले अंगलट, गुन्हा दाखल • ‘संडे मार्केट’ मध्ये सक्त कारवाईचे निर्देश

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर, 9 जानेवारी
महानगरातील कस्तुरबा व जयंंती चित्रपट गृह रस्त्यालगत रविवारी ‘संडे मार्केट’ भरतो. ऐन रस्त्यावर हातठेले थाटून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 10 हातठेले धारकांविरूद्ध मनपाने पोलिसात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, वाहतूकीस अडचण निर्माण झाल्यास ‘संडे मार्केट’ परिसरात रस्त्यावर दुकान लावणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्याचे सक्त निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.
रविवारी मनपाचे अतिक्रमण पथक पाहणी करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यू इंग्लीश स्कुल, आझाद गार्डन येथे मुजफ्फर शेख, असलम खान, इर्शाद शेख,अशपाक शेख, फिरोज कुरेशी, सुनीता तावाडे, बबलु खान, शाहबाज खान, अप्पु पठाण, एजाज परवेज असे 10 हातठेलेधारकांनी ऐन रस्त्यावर दुकाने लावली. त्यामुळे वाहतूकीस अडचण निर्माण झाली. दरम्यान, अतिक्रमण पथकाने त्यांचे दुकान साहित्य जप्त त्यांचे दुकान साहित्य जप्त केले. पथक जाताच पुन्हा त्यांनी त्याच ठिकाणी दुसरे सामान आणून दुकान लावले. त्यामुळे त्यांच्या मालासहित साहित्य जप्त केले. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध पापोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध भादंवि 283 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.