रायगड जिल्हा परिषद शाळा रेपोली माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे मानकरी.

✒️नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048

माणगाव तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन online पद्धतीने पार पडले.सदर विज्ञान प्रदर्शनात इयत्ता ६ वी ते ८ वीच्या गटात एकूण ३० शाळांनी सहभाग घेतला होता.
रेपोली शाळेने दरड कोसळण्या पूर्वी पूर्व सूचना देणारे उपकरण बनवले होते. सदर उपकरण दरड ग्रस्थ भागासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
सदर मॉडेलचे सादरीकरण हे इयत्ता ७ वीचा विद्यार्थी कु.पवन निलेश मोरे याने उत्तम प्रकारे केले तर त्याला मार्गदर्शन त्याचे वर्गशिक्षक सुनिल धर्मा गोरेगावकर सर यांनी केले. सदर मॉडेलसाठी शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर महाले सर, संध्या जायभाये मॅडम , जीवन तोरमल सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्पेश पिसाळ सर व मुख्याध्यापक महाले सर सर्व सदस्य आणि शाळेतील शिक्षक यांनी पवनचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माणगांव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुनिता खरात मॅडम, वरिष्ठविस्तार अधिकारी सुरेखा तांबट मॅडम , गोरेगाव बिट विस्तार अधिकारी कुमार खामकर सर , लोणेरे केंद्राचे केंद्र प्रमुख संजय खैरे सर तसेच गोरेगाव – माणगांव मधील सर्व शिक्षकवर्ग , रेपोलीमधील सर्व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेच्या रेपोली शाळेने केलेल्या ह्या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.