समाज सेविका सोनल घोले यांची श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष पदी निवड
पनवेल तालुका प्रतिनिधी
विजय तळकर
7208066088
पनवेल : जय श्री कृष्ण गवळी समाज उन्नती संस्था म्हसळाचे अध्यक्ष श्री रविंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हसळा गवळवाडी येथे श्री कृष्ण सामाजिक सभगृहात संपन्न झालेल्या सभेत वाडांबा गावाच्या स्नुषा,सालविंडे ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच,समाज सेविका सौभाग्यवती सोनल महेश घोले यांची नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे महीला अध्यक्षा निवड झाली आहे.त्यांचा आज संपन्न झालेल्या सभेत समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.