अनैतिक प्रेम संबंधांतून महिलेचा खून करीत मृतदेह फेकला नदीत

61
अनैतिक प्रेम संबंधांतून महिलेचा खून करीत मृतदेह फेकला नदीत

अनैतिक प्रेम संबंधांतून
महिलेचा खून करीत मृतदेह फेकला नदीत

अनैतिक प्रेम संबंधांतून महिलेचा खून करीत मृतदेह फेकला नदीत

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9096817953

नागपूर : – नागपूर अनैतिक प्रेम संबंधांतून युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने ४२ वर्षीय महिलेचा खून करीत तिचा मृतदेह नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय महिलेचे मूळचा उत्तरप्रदेश येथील २२ वर्षीय युवकाशी एक वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने युवकाला लग्नासाठी तगादा लावला. त्यामुळे चौदा दिवसांपूर्वी २७ तारखेला त्याने तिला भेटायला बोलावून साथीदाराच्या मदतीने खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून पारशिवनी जवळील एक नदीत फेकून दिला. मात्र, महिला घरी परत न आल्याने नातेवाईकांनी तिच्या मिसिंगची तक्रार दाखल केली.तपासात तिचे युवकाशी प्रेमसबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्यासह मित्राला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाचा शोधासाठी पारशिवनीकडे पथक पाठविल्याची माहिती आहे. अद्याप मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे.