भाविकांना प्रत्येक मंदिरात प्रसादा ऐवजी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचे निर्देश : डॉ. ओमप्रकाश शेटे

57
भाविकांना प्रत्येक मंदिरात प्रसादा ऐवजी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचे निर्देश : डॉ. ओमप्रकाश शेटे

भाविकांना प्रत्येक मंदिरात प्रसादा ऐवजी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचे निर्देश : डॉ. ओमप्रकाश शेटे

भाविकांना प्रत्येक मंदिरात प्रसादा ऐवजी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्याचे निर्देश : डॉ. ओमप्रकाश शेटे

ज्ञानेश्वर तुपसुंदर नाशिक तालुका
प्रतिनिधी मो. 8668413946

नाशिक : देशभरात केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या वतीने रुग्णांवर उपचार सुलभ व्हावे, यासाठी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने आज नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन नाशिक येथे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या वतीने राज्यातील पिवळे, केसरी आणि पांढरे रंगाचे रेशन कार्ड धारकांसाठी पाच लाखांचे मोफत आरोग्य उपचार सुलभ मिळावे, यासाठी संवाद दौरा सुरु करण्यात आल्याची माहिती समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

रुग्ण व रुग्णालयांनी जिवंत राहिणे आवश्यक आहे, सामान्य माणूस उपचारा अभावी वंचित राहता कामा नये, यासाठी समितीच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहास्तव ह्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. हीl समिती स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य असल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे १२ जानेवारी रोजी २७व्या युवा महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये उपस्थित असणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शनासाठी उपस्थित राहणार आहे यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना प्रसादा ऐवजी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करून नाशिक येथून प्रसादा ऐवजी भाविकांना आयुष्यमान भारत कार्ड देण्याचा संकल्प समितीने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी सर्व संस्था नाही आणि मंदिर प्रशासनाला याबाबत सूचना देणार असल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेपूर्वी आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेऊन केंद्राच्या आयुष्यमान भारत व राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा, व संदर्भ सेवा रुग्णालयातील कॅन्सर विभागातील रेडिएशन मशीन व इतर योजनेबाबत माहिती घेऊन या शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.