इंडस कंपनीच्या’ 3 मोबाईल टॉवरवर जप्तीची कारवाई • थकीत मालमत्ता कर चुकवणे कंपनीच्या अंगलट

62
इंडस कंपनीच्या' 3 मोबाईल टॉवरवर जप्तीची कारवाई • थकीत मालमत्ता कर चुकवणे कंपनीच्या अंगलट

इंडस कंपनीच्या’ 3 मोबाईल टॉवरवर जप्तीची कारवाई

• थकीत मालमत्ता कर चुकवणे कंपनीच्या अंगलट

इंडस कंपनीच्या' 3 मोबाईल टॉवरवर जप्तीची कारवाई • थकीत मालमत्ता कर चुकवणे कंपनीच्या अंगलट

🖋️ साहिल सैय्यद
📱93079 48197

घुग्गुस् : नगर परिषद हद्दीत येणाऱ्या मोबाईल टॉवर कंपनी कडे 2007 पासूनचा मालमत्ता कर थकीत होता. कराचा भरणा न केल्याने गुरुवार, 11 जानेवारी रोजी नगर परिषदेकडून इंडस कंपनीच्या 3 मोबाईल टॉवरवर नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 152 नुसार जप्तीची कारवाई करण्यात आली.
नगर परिषद मार्फत थकीत कराचा भरणा करण्याबाबत वारंवार नोटीस देऊन सुद्धा मोबाईल टॉवर कंपनीने मालमत्ता कराचा भरणा न केल्याने मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक निलेश तुराणकर, कर निरीक्षक अर्चना दिंगलवार, पाणी पुरवठा अभियंता सोनाली नागरगोजे, लिपिक शंकर पचारे, मोहसीन कुरेशी, रवींद्र गोहोकार, व इतर कर्मचारी यांच्या मार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली.