घर टॅक्स कमी करण्याकरता नगर पंचायत चे साफ दुर्लक्ष
नगर विकास संघर्ष समिती भिख मागो आंदोलन करून न्यायालयातून न्याय मिळवून देणार
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्ह्यात गाजलेली मोहाडी नगर पंचायतीने मोहाडी नगरपंचातीवर अव्वा ढव्वी कर लादून, अतोनात घर टॅक्स लादण्यात आला आहे. व ते मोहाडी वासीयांकडून अतीरिक कर शुद्धा घेत आहेत. हजारोच्या संख्येने नगर विकास संघर्ष समिती व मोहाडीनगर वसियानी जनआक्रोश मोर्चा काढला. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नगर पंचायत ने विषेश सभा बोलावून घर टॅक्स वाढी विरोधात एकमताने ठराव घेतला , पण लई हुशार मुख्याधिकारी यांनी हिटलर शाही दाखवीत ठरावा विरोधात मा.जिल्हाधिकारी यांचेकडे सदर ठराव निलंबित करण्याकरिता अर्ज केला. अखेर तो ठराव मा. जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक.१३ डिसेंबर २०२३ रोजी ठराव नामंजूर केला. पण नगरसेवक, नगरसेविका हे घर टॅक्स कमी करण्याकरता अजिबात इच्छुक नसल्याचे समजते. कारण की मा. जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक १३ डिसेंबर २०२३ ला दिलेल्या निर्णयाचा विरोधात ३० दिवसाच्या आत अपील करणे बंधनकारक आहे. या करीता नगर विकास संघर्ष समितीने दिनांक ४ जानेवारी २०२४ ला निवेदन देऊन जिल्हाधिकारीच्या आदेशा विरोधात महाराष्ट्र नगर परीषद व ओदयोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ पोटकलम (३) नुसार मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक. नगर परिषद प्रशासन विभाग, आयुक्त कार्यालय नागपूर यांचेकडे अपील करण्यात यावे अशी विनंती केलेली होती. पण अजुन पर्यंत नगरपंचायतीने अपील दाखल केलेली नाही. जर अपील दाखल केली नाही तर जिल्हाधिकारी साहेब तो आदेश कायम ठेवतील. व अतोणात वाढविलेला घर टॅक्स हा जीवनभर मोहाडी नगरवासियांना भरावा लागणार आहे. एक वेळा वाढविलेला घर टॅक्स कधीच कमी होणार नाही.
जनतेने निवडूण दिलेले नगरसेवक फक्त पैसे कमावण्यात धन्यता मानत आहेत. वेगवेगळे फंडातून भ्रष्टाचार करणे, घनकचरा व्यवस्थापन करीता प्रत्येकी पन्नास हजार रुपये अमानत घेऊन सर्व गप्प बसले आहेत. पण मोहाडी नगरवासियावर लादलेला अतोनात घर टॅक्स कमी करण्याकरता कोणताही नगरसेवक सामोर येत नसून , याचाच अर्थ जाणून बुजून मोहाडी नगर वासियावर घर टॅक्स वाढ झाली पाहिजे , हा शुद्ध हेतू या वरुन दिसत आहे. आता पर्यंत यांनी अपील केली नसल्याने नगर विकास संघर्ष समिती मोहाडी नगर वासियांना सोबत घेऊन लवकरच भिखं मांगो आंदोलन करून पैसे गोळा करून न्यायालयात दाद मागणार असल्याची प्राथमिक माहीती आहे. न्यायालयातून घर टॅक्स कमी करण्याकरीता मोहाडी वासियांणी सहकार्य करावे असे आवाहन खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, आदर्श बडवाईक, ग्यानेंद्र आगाशे विनोद बाभरे, विनोद नंदनवार , नारायण निखारे, गणेश नीमजे, सुभाष भाजीपाले, बबलू शेख, रमेश गोंडाणे, अविनाश पेशने, रामप्रसाद मानकर, गणेश पात्रे, हंसराज नीमजे, अनंतराम मेश्राम यांनी केले आहे