मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी, मोहाडी तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेने दिले निवेदन

58
मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी, मोहाडी तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेने दिले निवेदन

मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी,

मोहाडी तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेने दिले निवेदन

मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी, मोहाडी तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेने दिले निवेदन

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞

भंडारा : ( मोहाडी ) भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दुकान चालवीत असतांना अनेक समस्या उद्भवत असतात. तरी देखील शासन पाठपुरावा का करीत नाही ? अशा मोठा प्रश्न मोहाडी तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेकडून विचारले जात आहे. रेशन दुकानदार संघटने कडून दुकानदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरीय आंदोलन सुरू असतांना देखील शासन मात्र चुप्पी साधून मौन अवस्थेत का आहे ? मोहाडी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी मोहाडी तहसील कार्यालयासमोर निदर्शने व विविध मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना किमान ३०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणेच कमिशन मंजूर करावे. कमिशनचे परतावा धान्याची उचल व विक्री केल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्याची धान्याची उचल करण्यापूर्वी खात्यात जमा करण्यात यावी , व्यवस्थापन खर्च म्हणून ५००० रुपये प्रति महिना अतिरिक्त देण्यात यावा. आनंदाचा सीधा योजनेतील गहू , तांदूळ नेहमीप्रमाणे देण्यात यावे, मागील चार महिन्यापासून पैसे भरून सुद्धा साखर मिळाली नाही. दर महिन्याला नियमित साखर देण्यात यावी, धान्याची हाताळणूक स्वच्छता वितरण करताना गहू तांदळात होणारी तूट प्रतिक्विंटल एक किलो मंजूर करण्यात यावी, दिलेल्या मशीन मध्ये टूजी सीम वापरण्यात आलेली आहे याविषयी राज्य सरकारने दखल घेत ई -पॉस मशीन द्वारे व्यवहार करताना धान्य वितरणामध्ये होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात , रेशन दुकानदारांच्या विमा काढण्यात याव्यात, आदी मागण्यांचा समावेश आहेत.अशी मोहाडी तालुका स्वस्त धान्य संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आलेली आहे.
निवेदन देतेवेळी मोहाडी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळू बोबडे,सुभाष मेहर,गोलू रोडके , मिथुन लिल्हारे ,प्रवीण सव्वालाखे , हेमराज लांजेवार , प्रशांत चव्हाण , विजय पडोळे आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.