एकोणावासियांचा मुख्य रस्ता खोदून बंद करण्याचा प्रयत्न • वेकोलीच्या कारभाराने गावकरी संतप्त

61
एकोणावासियांचा मुख्य रस्ता खोदून बंद करण्याचा प्रयत्न • वेकोलीच्या कारभाराने गावकरी संतप्त

एकोणावासियांचा मुख्य रस्ता खोदून बंद करण्याचा प्रयत्न

• वेकोलीच्या कारभाराने गावकरी संतप्त

एकोणावासियांचा मुख्य रस्ता खोदून बंद करण्याचा प्रयत्न • वेकोलीच्या कारभाराने गावकरी संतप्त

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

वरोरा : 13 जानेवारी
एकोणा ते चरूरखटी फाटा हा मुख्य रस्ता वेकोलीने शुक्रवारी पहाटे अचानकपणे तीन ठिकाणी खोदून काढल्याने एकोणा ग्रामवासीय संतप्त झाले.त्यांनी रात्रीच विरोध केल्याने वेकोलीने हे खोदकाम थांबवले व गावकऱ्यांचा विरोध पाहता वेकोलीने खोदलेला रस्ता पूर्ववत करून दिला. हा रस्ता एकोणावासीयांना चरूरखटी फाट्यावर येण्यासाठी पूर्वापार चालत आलेला आहे. मात्र हा रस्ता बंद करण्यासंबंधात ग्रामपंचायतीने वेकोलीला नाहरकत प्रमाणपत्र दिले. हे ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले, यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश तहसील प्रशासनाने दोनच दिवसापूर्वी ग्रामसचिवांना दिले आहे.
ग्रामपंचायत एकोणा परिसरातील शेतजमीन वेकोलीने २०१६ मध्ये संपादीत करून कोळसा खाण सुरु केली आहे. या कोळसा खाणीअंतर्गत गावामध्ये येणारा मुख्य रस्ता एकोणा ते चरूरखटी हा मुख्य रस्ता आहे. ११ जानेवारी, शुक्रवारी पहाटे तीन च्या सुमारास वेकोलीने हा मुख्य रस्ता खोदून बंद केलेला होता, गावातील लोकांनी विरोध दर्शविल्यावर रस्ता खोदण्याचे काम थांबविले आहे.
मौजा एकोणा गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता सोयीचा आहे तसेच या गावातील उर्वरीत शेतजमीन संपादीत व गावाचे संपूर्ण पुनर्वसन होतपर्यंत हा रस्ता कायम ठेवण्यात यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
तसेच या रस्त्यावरून गावातील वाहने जात असतांना गावकऱ्यांना “ये-जा करण्याकरीता अडचण निर्माण होणार नाही याची वेकोलीकडून काळजी घेण्यात यावी. तसेच हा रोड खोदकाम करतांना आपण ग्रामपंचायत एकोणा व गावकरी जनतेला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे गावकरी जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे.
यापुढे वेकोलीकडून असा प्रकार करण्यात येवू नये करीता वरील सर्व समस्यांचे निराकरण होईपर्यंत मौजा एकोणा गावाचा मुख्य रस्ता मौजा एकोणा ते चरूरखटी फाटा हा मुख्य रस्ता कायम ठेवण्यात यावा अश्या विनंतीचे निवेदन देण्यात आले आहे.