अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र यांसकडून सौ. माधवीताई नरेश जोशी यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
पाचाड;-स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेब अखंड हिंदुस्थान निर्मिती साठी विशेष कारकीर्द बजवणाऱ्या स्त्री योद्धा यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त आज पाचाड येथे अत्यंत उस्तःपुर्ण वातावरणात जिजाऊ जयंती सोहळा पार पडला. ताराराणी ब्रिगेड ही सावित्री बाई फुले आणि जिजाऊ आऊसाहेब यांच्या विचारांची लढाऊ संघटना आहे. जिजाऊंची प्रेरणा चिरंतर जागृत राहावी या करीता ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी पाचाड येथे “जिजाऊ जयंती” उत्सव साजरा करीत असताना उत्कृष्ट समाजसेविका म्हणून सौ माधवी ताई जोशी यांच्या समाज कार्याची दखल घेऊन या वर्षीचा “जिजाऊ पुरस्कार” सौ. माधवी नरेश जोशी,राहणार आंबीवली, ता.कर्जत,जि.रा यगड यांना राष्ट्रीय अध्यक्ष वंदना ताई मोरे यांच्या हस्ते माधवी ताईंना जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माधवीताई या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात स्वावलंबी होणेसाठी विविध शैक्षणिक साहित्य,संगणक संच देऊन आपली शिक्षण क्षेत्रातील कळकळ जाणवली तसेच गरीब आदिवासी बांधवांना ईरसालवाडी दुर्घटनेत सामाजिक बांधिलकी म्हणून केलेले कार्य विशेष कौतुकास्पद आहे. आपण कर्जत,पनवेल,खालापूर येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली समाजाप्रती असलेली आस्था दिसून येते. जिजाऊंची प्रेरणा आपल्या समाजातील प्रत्येक घरोघरी पोहचवण्याची अविरत सेवा आजही सुरूच आहे.पर्यावरण प्रचार आणि प्रसार करणेसाठी आपण राबवित असलेले वृक्षारोपण लक्षवेधी आहे. विविध महिला मंडळे, महिला बचतगट यांचे सक्षमीकरणासाठी आपण करीत असलेले प्रयत्न वैशिष्टयपूर्ण आहेत. महिलांना गृहउद्योग, लघुउद्योगांसाठी आणि रोजगार मिळवून देणेसाठी आपण सतत धडपड करीत असता.
अनेक सण आणि उत्सवांचे सांस्कृतिक कार्यक्रमातही आपण स्वतः भार रोऊन सर्वांना प्रोत्साहन देता,आदिवासी बांधवांच्या मुलांना दिवाळीचा सण साजरा करणेसाठी फराळ, फटाके देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करीत आहात. आपल्या या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा या क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी आज आपणास मातृतीर्थ पाचाड,रायगड येथे जिजाऊ जयंती निमित्त विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.भविष्यातही आपल्या हातून असेच सत्कर्म घडावीत ही सदिच्छा.
तर यावेळी माधवी ताई जोशी यांनी सांगीतले की मी नेहमीच आपल्या सर्वांच्या सहवासातून समाजप्रबोधन पर उपक्रम राबवत राहील आणि समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरिता प्रयत्न करेन
या सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष कविता खोपकर
मा.प्रदेश अध्यक्ष मेघा मोरे,
रायगड जिल्हा अध्यक्ष वर्षा मोरे,
ठाणे जिल्हा अध्यक्ष शालिनी भोईर,
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गीता चव्हाण तसेच महारष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री.नरेश जोशी हे उपस्थित होते.