बल्लारपूर येथील नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा आकास्मिक मृत्यू
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
विसापूर : 13 जानेवारी
बल्लारपूर येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीची प्रकृती अस्वस्थ वाटत होती. ती उपचारासाठी एका रूग्णालयात गेली. तिने प्राथमिक उपचार घेतल्यानंतर औषधी दुकानात औषध घेण्यासाठी गेली. त्याच वेळी तिला चक्कर आली. ती डोक्याच्या भारावर पडली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथे घडली. नंदिनी प्रकाश कैथवास असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
बल्लारपूर येथील नंदिनी कैथवास ही बामणी ( दुधोली ) येथील एका नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत होती. शुक्रवारी तिच्या महाविद्यालयामध्ये कार्यक्रम होता. दिवसभराचा कार्यक्रम करून ती घरी आली. मात्र, तिला अस्वस्थ वाटत होते. ती लगेच वडिलांसोबत एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेली. तिने उपचार करून औषधी विकत घेण्यासाठी दुकानात गेली. त्या वेळी तिला चक्कर आली. ती धडकन खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी नंदिनीला तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील दवाखान्यात उपचारार्थ नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला.