लोणेरे येथील राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच सिताराम शिर्के आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेत दाखल
शिवसेना उपनेते विधिमंडळ मुख्य पक्ष प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत सदर पक्षप्रवेश घेण्यात आला
✍️सचिन पवार /संदेश बादल ✍️
📞8080092301📞
📰मीडिया वार्ता न्यूज📰
रायगड :-माणगाव तालुका लोणेरे ग्रामपंचायत हद्दीतील लोणेरे नवघर येथील राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच सिताराम शिर्के यांची संपूर्ण भावकी शिवसेना करत असलेल्या विकास कामावर विश्वास ठेवत आज ढालकाठी येथील (शिवनेरी) या निवासस्थानी लोणेरे विभागातील पदाधिकाऱ्यांच्या आणि आमदार भरत शेठ गोगावले, यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी प्रवेश करते सिताराम शिर्के भाऊसाहेब शिर्के नथुराम शिर्के चंद्रकांत शिर्के प्रदीप शिर्के सुधीर शिर्के सुभाष शिर्के गजानन शिर्के सुरेश शिर्के अनिल शिर्के ज्ञानेश्वर शिर्के नारायण शिर्के अनंत शिर्के मानसी शिर्के शिर्के योगिता शिर्के रेश्मा शिर्के कल्पना शिर्के सुनिता शिर्के रूपाली शिर्के जयवंती शिर्के सुरेखा शिर्के अनिता शिर्के सुलोचना शिर्के शैलावंती शिर्के राजश्री शिर्के सुनंदा शिर्के दर्शना शिर्के चंद्रकला शिर्के जयश्री शिर्के वनिता शिर्के शुभांगी शिर्के जनाबाई शिर्के जयू धसाडे,इत्यादी महिला भगिनी आणि पुरुष वर्गाने शिवसेनेत प्रवेश केला.या पक्षप्रवेश समारंभ वेळी उपस्थित अरुण चाळके नथुराम करकरे रवींद्र टेंभे महेंद्र तेडगुरे दिलीप टेंबे समाधान करकरे इत्यादी आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे लोणेरे ग्रामपंचायत विभागात शिवसेनेची ताकद वाढत चालली असून आणखी दोन वाड्या याच गावातील शिवसेनेत प्रवेश करण्याचया तयारीत असल्याचे सांगण्यात आले.पक्षप्रवेश करण्याचे कारण शिवसेना महाड विधानसभा मतदारसंघात करत असलेली विकास कामे आणि जनतेला असलेला विश्वास यामुळेच विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.